शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

  रिसोड नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी  २४ जानेवारीला निवडणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:45 IST

रिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी  २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने आणि मध्यंतरीच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्याने उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागून आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : रिसोड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी  २४ जानेवारीला निवडणुक होत आहे. कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसल्याने आणि मध्यंतरीच्या काळात नाट्यमय घडामोडी घडल्याने उपाध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची उत्सुकता लागून आहे. १० डिसेंबर २०१८ रोजी रिसोड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहिर झाला होता. अटितटीच्या झालेल्या या निवडणुकीत माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या वाशिम जिल्हा जनविकास आघाडीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या ९ पदांवर विजय मिळविला होता तर काँग्रेस तीन, शिवसेना तीन, भारिप-बमसं दोन आणि अपक्ष तीन असे पक्षीय बलाबल आहे. कुणालाही स्पष्ट बहुमत नसल्याने उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी घडल्या. वाशिम जिल्हा जनविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मध्यंतरी सर्व जण एकत्र येण्याच्या वेगवान घडामोडीही घडल्या. त्यानंतर जनविकास आघाडीच्या नेत्यांनीदेखील बहुमतासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जूळविण्याकरीता मोर्चेबांधणी केली. काँग्रेस, शिवसेना, अपक्ष व भारिप-बमसं मिळून उपाध्यक्ष पद काबीज केले जाते की अपक्ष, भारिपला सोबत घेऊन जनविकास आघाडीचा उमेदवार  उपाध्यक्षपदावर विराजमान होतो, याचा फैसला गुरूवार, २४ जानेवारी रोजी होणार आहे. नाट्यमय घडामोडीमुळे उपाध्यक्ष कुणाचा होणार, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडElectionनिवडणूक