लोकमत न्यूज नेटवर्कराजूरा (वाशिम) - शेतात काम करीत असताना, वीज पडून ६० वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना कुरळा शेतशिवारात ३१ मे रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश कोंडीबा मोहरे असे मृतकाचे नाव आहे.मालेगाव तालुक्यातील कुरळा येथील प्रकाश मोहरे हे बुधवारी स्वत:च्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास वादळवाऱ्यासह विजांचा कडकडाटात पाऊस सुरू झाला. या दरम्यान प्रकाश मोहरे यांच्या अंगावर वीज पडल्याने जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
वीज पडून वृद्ध ठार
By admin | Updated: May 31, 2017 20:23 IST