शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

आठ हजारांवर कृषी पंप जोडण्या प्रलंबित!

By admin | Updated: April 19, 2017 01:08 IST

वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही.

जिल्ह्यातील वास्तव : बहुतांश अर्ज दोन वर्षांपूर्वीचे! वाशिम : जिल्ह्यात ८ हजार ७९४ शेतकऱ्यांनी रितसर कोटेशन भरूनही त्यांना अद्याप कृषीपंपासाठी वीज जोडणी मिळू शकली नाही. यातील ७० टक्के अर्ज दोन वर्षांपूर्वीचे असून, अनुकूल वातावरणातही काम संथगतीने होत असल्याने शेतकऱ्यांना वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत असल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी शासनाच्यावतीने सिंचन, विहिरी, शेततळे, सूक्ष्म सिंचन योजनांसारखे उपक्रम शासनाच्यावतीने राबविले जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरीही उत्सुक आहेत; परंतु प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक अडचणींमुळे शासनाच्या बव्हंशी योजनांचा पुरेपूर लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. यात प्रामुख्याने कृषी पंपांच्या रखडलेल्या वीज जोडण्यांचा मुद्दा समाविष्ट आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७९४ कृषी पंप वीज जोडण्या प्रलंबित आहेत. यामध्ये २०११-१२ पासून ते २०१५-१६ पर्यंतच्या ५ हजार ७९५ जोडण्यांचा समावेश आहे, तर यंदा मार्च अखेरपर्यंत आणखी २ हजार ९९९ श्ेतकऱ्यांनी कृषी पंप जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज सादर केले आहेत. त्यातही पायाभूत सुधारणा आराखडा-२ आणि विशेष अनुदानांतर्गत एकूण ६ हजार ५४ प्रस्ताव प्रलंबित आहेत. यामधील पायाभूत सुधारणा आराखडा-२ मधील ६४९ जोडण्यांसाठी १४.५२ कोटी, तर विशेष अनुदान योजनेंतगर्तच्या ३ हजार ६६६ जोडण्यांसाठी ४५.६९ कोटींचा नियतव्यय उपलब्ध असल्याची माहिती असून, मार्च अखेर या दोन्ही योजनांत प्रलंबित असलेल्या एकूण ६ हजार ६४ कृषी वीज जोडण्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी म्हणून २१.९७ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव महावितरणच्या जिल्हा कार्यालयाकडून वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला असल्याची माहिती आहे. खरीप आणि रब्बी हंगामात शेतात पिके असल्यामुळे कृषी पंप जोडण्यांची कामे प्रामुख्याने प्रलंबित राहतात. तथापि, जिल्ह्यातील बव्हंशी क्षेत्र खरीप हंगामानंतर मोकळे असते. वीज जोडणीच नसल्यामुळे अनेक शेतकरी सिंचनही करू शकत नसल्याने या एप्रिलपासून कृषी पंप जोडण्यांच्या कामाला वेग मिळणे अपेक्षित असते; परंतु तसे होत असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती २०११ पासून आजवरच्या सहा वर्षांच्या कालावधित कृषी पंप जोडण्यांच्या वाढतच असलेल्या संख्येवरून दिसत आहे. जिल्ह्यातील विभागवार प्रलंबित वीज जोडण्यांचा विचार केल्यास वाशिम उपविभागात १ हजार ५०९ जोडण्या प्रलंबित आहेत. मालेगावात १ हजार ४७४, रिसोडमध्ये १ हजार ४७३, मंगरुळपीर उपविभागात ४८५, मानोऱ्यात १ हजार १७५, तर कारंजा उपविभागात १ हजार ८९६ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यातील प्रलंबित कृषी पंप जोडणीच्या कामांना वेग देण्यात आला आहे. यासाठी टेंडरिंंगचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत ६० टक्क्यांहून अधिक वीज जोडण्यांचे काम पूर्ण करण्याचा निर्धार आहे. यासंदर्भात सर्व कंत्राटदारांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.-दत्तात्रय बनसोडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वाशिम.