शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ईदनिमित्त वाशिमात जल्लोष; मुस्लीम बांधवांनी काढली मिरवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : ईदनिमित्त शहरातील मुख्य मार्गावरुन मुस्लीम बांधवांनी भव्य मिरवणुक काढून ईद उत्साहात साजरी केली. यावेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ईदनिमित्त शहरातील मुख्य मार्गावरुन मुस्लीम बांधवांनी भव्य मिरवणुक काढून ईद उत्साहात साजरी केली. यावेळी मिरवणुकीत असलेल्या डिजेवर तरुणाई थिरकताना आढळून आली. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने वाशिम शहरातील मुख्य मार्गावरुन ही मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जागोजागी मिरवणुकीतील नागरिकांसाठी चहा, नाश्ता व पाण्याची व्यवस्था अनेकांनी केली होती.मुस्लिम समाज बांधवांचयवतिने मिरवणुक मार्गावर लावण्यात आलेले हिरवे झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. शिवाजी चौकापासून ते पाटणी चौकापर्यंत मिरवणुकीत सहभागी नागरिकांना पाण्याची , चहाची व नाश्याची व्यवथा सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेकांनी केली होती. मिरवणुकीचा त्रास कोणालाही होवू नये याकरिता रस्त्याच्या एका बाजुने शिस्तबध्द पध्दतीने मिरवणूक काढून मुस्लिम बांधवांनी ईद उतसाहात साजरी केली. यावेळी पोलीस विभागाच्यावतिनेही कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनेक वेगवेगळया वेशभुषेमध्ये मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते. हातात हिरवे झेडे व डिजेच्या तालावर तरुणाई मोठया प्रमाणात थिरकतांना दिसून आली. युवकांमध्ये या मिरवणुकीमध्ये मोठया प्रमाणात उत्साहाचे वातावरण दिसून आले. कुठेही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शिरपूरात ईद मिलादुन्नबीनिमित्य मिरवणूक उत्साहात                                                             शिरपुर जैन.. येथे मुस्लिम बांधवांच्यावतीने ईद मिलादुन्नबी साजरी करण्यात आली. यानिमित्त २१ नोव्हेंबर रोजी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.  शिरपूर येथे दरवर्षी मुस्लिम धर्मियांच्या वतीने ईद मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी केल्या जाते. यावषीर्ही ईद मिलादुन्नबीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये १९  नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर संपन्न झाले.२० नोव्हेंबरला धार्मिक कार्यक्रम पार पडले.२१ नोव्हेंबर रोजी चिंचेच्या झाडापासून ईद मिलादुन्नबी निमित्त ढोल ताशे बेंजोच्या निनादात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये मुस्लिम युवक ढोल ताशाच्या तालावर थिरकताना दिसले. मिरवणुकीतील सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांसाठी नगीना मशीद, गुजरी चौक, बागवान पुरा, पोलिस स्टेशन जवळ शरबत, चहापाणी, तथा अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. मुस्लिम बांधवांनी ही पोलिस स्टेशन जवळ पत्रकार तथा गावातील मान्यवर मंडळींचा सन्मान केला.

टॅग्स :washimवाशिम