शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचा प्रयत्न ! - जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 16:12 IST

​​​​​​​वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

ठळक मुद्देनागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे.१०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल.. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल.

वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी केले. 

नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा खर्च होतो. त्यामुळे नागरिकांना दूरध्वनीवरून आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष सुरु करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या एकदिवस अगोदरच्या शासकीय कामकाजाच्या दिवशी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत १०७७ या टोल फ्री क्रमांकद्वारे अथवा ०७२५२-२३११२० या दूरध्वनी क्रमांकावरून नागरिकांची तक्रार दाखल करून घेतली जाईल. त्याविषयीची आवश्यक कागदपत्रे ई-मेल अथवा ८३७९९२९४१५ या व्हाटसअप क्रमांकाद्वारे स्वीकारले जातील. तालुकास्तरीय लोकशाही दिनात दाखल झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत निकाली न निघालेली तक्रार ई-लोकशाही कक्षात दाखल करता येईल. ई-लोकशाही कक्षासाठी लवकरच नवीन संगणक प्रणाली विकसित करून त्याद्वारे संबंधित तक्रारदाराला त्याच्या तक्रार अर्जाविषयीची सद्यस्थिती मोबाईल क्रमांकावर कळविली जाणार आहे.

ई-लोकशाही कक्षात दाखल झालेली तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. या तक्रारींचा जलद गतीने निपटारा होण्यासाठी प्रत्येक आठवड्याला याविषयी आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. मिश्रा यांनी यावेळी सांगितले. तसेच जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान यासारख्या संरक्षित सिंचन सुविधा निर्मितीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. कर्जमाफी योजना तसेच पीक कर्ज वाटपाच्या अनुषंगाने सर्व संबंधित बँकांना सूचना देण्यात आल्या असून दोन दिवसात सर्व बँक अधिकाºयांची बैठक घेऊन याबाबतचा आढावा घेणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमcollectorतहसीलदार