शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 12:24 IST

वाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे.कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष दोन टक्क्यांवर आणणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. विविध विभागांशी समन्वय साधून महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करावे लागणार आहे.

 - संतोष वानखडेवाशिम : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत ० ते ६ वर्षे वयोगटातील बालके तसेच १५ ते ४९ वर्षे वयोगटातील मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण ९ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये वाशिमचा समावेश आहे.राष्ट्रीय पोषण मिशनचे नाव बदलून पोषण अभियान असे नामकरण मे २०१८ मध्ये करण्यात आले असून, राज्यातील ३० जिल्ह्यांत पोषण अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षात पोषण अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या अभियानांतर्गत एकूण पाच उद्दिष्टे साधली जाणार आहेत.अंगणवाडी केंद्रातील बालकांना पोषण आहार पुरविला जातो. या अभियानांतर्गत आता महिला व बालकल्याण विभागाला अधिक सतर्क राहून उद्दिष्टपूर्तीच्या दृष्टीने विविध विभागांशी समन्वय साधून कामकाज करावे लागणार आहे. ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील खुजे, बुटकेपणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्षे २ टक्क्यांवर आणणे, ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण हे ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष २ टक्क्यांवर आणणे, ६ ते ५९ महिने वयोगटातील बालकांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ टक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, १५ ते ४९ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुली व महिलांमधील रक्तक्षयाचे प्रमाण हे ९ ठक्क्यांवरून प्रतिवर्ष ३ टक्क्यांवर आणणे, जन्मत: कमी वजनाचे असणाऱ्या बालकांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून प्रतिवर्ष दोन टक्क्यांवर आणणे आदी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुषंगाने विविध विभागांशी समन्वय साधून महिला व बालकल्याण विभागाला नियोजन करावे लागणार आहे.विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचनापोषण दर्जा सुधारणे तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी ठरविण्यात आलेली उद्दिष्टे साध्य करण्याकरिता विविध स्तरावर उपक्रम राबविण्याच्या सूचना शासन स्तरावरून जिल्हास्तरीय यंत्रणेला प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुषंगाने शासनाकडून अंगणवाडी केंद्रांसाठी साहित्य व साधनसामग्रीदेखील टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांना मोबाइल फोन व सीमकार्ड डाटाप्लॅनसह पुरविले जाणार आहे.अंगणवाडीतील पोषण आहारासंदर्भात सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. शासन परिपत्रक व वरिष्ठांच्या सूचनेनुसार वाशिम जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाईल.- दीपककुमार मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम.

 

टॅग्स :washimवाशिम