रस्त्याची दैना, वाहनचालक त्रस्त
वाशिम : तालुक्यातील पांदण रस्त्याची दैना झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी १० ते १५ मीटर अंतराचे खड्डे पडले असून, गेल्या काही वर्षांत एकदाही या रस्त्याची साधी डागडुजी करण्यात आलेली नाही. वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांतर्फे केली जात आहे.
वारंवार विद्युत पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त
रिसाेड : येथील महावितरण कार्यालयांतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील फिडर वरील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प
वाशिम : शहरातील वाशिम-हिंगोली रस्त्यावर शुक्रवारी दुपारी ११ ते १२ वाजेच्या सुमारास वाहतूक जागीच ठप्प झाल्याचे दिसून आले. जलकुंभ नजीकचे रेल्वे गेट बंद असल्याने हा प्रकार घडला.