शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ‘इ-क्लास’ जमिनीवर शेततळ्यांसाठी ग्रामस्थ उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 14:35 IST

वाशिम : भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात सुजलाम्-सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात सुजलाम्-सुफलाम् अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गावोगावी जलसंधारणाची कामे प्रस्तावित केली जात असून ‘इ-क्लास’ जमिनींवर मोठ्या स्वरूपातील शेततळी खोदली जाणार आहेत. त्यासाठी अनेक गावांमधील ग्रामस्थ उत्सुक असून यासंदर्भात ग्रामपंचायतींकडूनही रितसर ठराव पारित केले जात आहेत.यासंदर्भात अधिक माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी सांगितले, की वाशिम जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांमध्ये जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे प्रस्तावित करून संपूर्ण जिल्हा सुजलाम्-सुफलाम् करण्यासंबंधी युद्धस्तरावर जनजागृती केली जात आहे. यासाठी गावोगावी शिवारफेरी काढून जलसंधारणाचा जागर करण्यात आला. पुढच्या टप्प्यात प्रस्तावित कामांसंबंधी ग्रामपंचायतींनी ठराव घेवून प्रशासनाकडे सादर केले आहेत. बीजेएस आणि जिल्हा प्रशासनाने यासाठी ठेवलेल्या अटी बहुतांश ग्रामपंचातींनी मान्य करून कामे करण्यासाठी उत्साह दाखविला आहे. विशेषत: इ-क्लास जमिनींवर मोठ्या स्वरूपातील शेततळे खोदण्याची बाब या मोहिमेअंतर्गत प्रस्तावित असून ही कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत, असे हिंगे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती