शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘डीजे’वरून मालेगाव येथे दुर्गा विसर्जन मिरवणूक तीन तास ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 17:35 IST

मिरवणुकीदरम्यान मंडळांनी ‘डीजे’ लावल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला तर दुसºया बाजूने ‘डीजे’चा आग्रह कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ या दरम्यान मिरवणूक एका जागेवरच ठप्प होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम) : मालेगाव येथे १९ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजतापासून दुर्गा विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. दरम्यान, मिरवणुकीदरम्यान मंडळांनी ‘डीजे’ लावल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला तर दुसºया बाजूने ‘डीजे’चा आग्रह कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ या दरम्यान मिरवणूक एका जागेवरच ठप्प होती. नगराध्यक्ष पती अरूण बळी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्याने ४.३० वाजता मिरवणूक पूर्ववत झाली.मालेगाव येथे सकाळी १० वाजतापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला होता. दुपारी १ वाजेदरम्यान काही नवदुर्गा मंडळाच्यावतीने विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ लावल्याचा प्रकार निदर्शनात आल्याने पोलीस प्रशासनाने मंडळावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. ‘डीजे’चा आवाज कमी करा, नाहीतर डीजे मालक व गाडीवर कायदेशीर कारवाई करू अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतली तर दुसरीकडे ‘डीजे’चा आग्रह काही मंडळांकडून कायम राहिल्याने दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान मिरवणूक ठप्प होती. काही मंडळाच्या पदाधिकाºयांनी अन्य सण, उत्सवादरम्यान काही मिरवणुकांमध्ये ‘डीजे’ चालतो का नाही? असा सवाल उपस्थित केला. प्रकरण मिटत नसल्याचे पाहून शेवटी नगराध्यक्ष पती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरुण बळी यांनी यशस्वी मध्यस्थी करीत नवदुर्गा मंडळाच्या पदाधिकाºयांची समजूत काढली. त्यानंतर विसर्जन मिरवणूक पूर्ववत झाली. यादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव