शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

कंकरवाडी आणि बोरखेडी येथे ग्रामस्थांसाठी खोदल्या कूपनलिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 14:52 IST

रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस  सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे.

ठळक मुद्देसुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. यापुर्वी त्यांनी कंकरवाडी येथे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठाही सुरू केला आहे.   पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या हजारो ग्रामस्थांना त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचा मोठा दिलासा मिळू शकणार आहे. 

 

रिसोड : तालुक्यातील कंकरवाडी आणि बोरखेडी येथे निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेत. भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस  सुनिल कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदून ग्रामस्थांला पाणीटंचाईच्या काळात मोठा दिलासा दिला आहे. त्याशिवाय भर जहागीर येथेही कूपनलिका खोदण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.  कंकरवाडी आणि बोरखेडी येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. आजुबाजुला पाण्याची कुठेही सोय उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात पाणी टंंचार्इृचा सामना करावा लागतो. टँकर सुरू करण्याची मागणी असतानाही, हा प्रश्न सुटू शकला नाही. पाणीटंचाईच्या काळात सरकारी मदत  न मिळाल्यामुळे गावकºयांची गरज लक्षात घेऊन कायंदे यांनी दोन्ही गावांत स्वखर्चाने कूपनलिका खोदली असूून, यावर हातपंप बसविण्यात येणार आहे.  कंकरवाडी गावाची लोकसंख्या सुमारे सात हजार असून, बोरखेडीची लोकसंख्याही सहा हजार आहे. या दोन्ही गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्याअभावी मोठे हाल होत आहेत.    दुष्काळी परिस्थितीत परिसरात जलस्त्रोत आटल्याने ग्रामस्थांना विकतच्या पाण्याने गरजा भागवाव्या लागत आहेत.  आता  कायंदे यांनी दोन्ही गावांत कूपनलिकांवर हातपंप बसविण्यात येणार असल्याने सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी त्यांनी कंकरवाडी येथे टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठाही सुरू केला आहे.  आता भर जहाँगिर येथेही त्यांनी कंकरवाडी आणि बोरखेडीप्रमाणेच ग्रामस्थांच्या सोयीसाठी स्वखर्चातून कूपनलिका खोदण्याची तयारी केली असून, येत्या काही दिवसांतच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या तिन्ही गावांतील कूपनलिकांवर ते स्वखर्चाने हातपंपह बसविणार आहेत. त्याशिवाय तालुक्यातील ज्या गावांना  पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या गावांतही मोफत पाणी पुरवठा करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या हजारो ग्रामस्थांना त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचा मोठा दिलासा मिळू शकणार आहे. 

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड