वाशिम : शहरात १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे जुन्या शहरातील संपूर्ण रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.वाशिम येथे १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ३.३0 वाजताच्या दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. जुन्या शहरातील काटीवेश भागात संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी असल्याने नागरिकांना पाण्यातून जातांना मोठी कसरत करावी लागली. अरूंद रस्ते व पाणी निघून जाण्याकरिता पाहिजे तशी व्यवस्था नसल्याने रस्त्यावर पाणी असल्याचे नागरिक बोलताहेत. पावसाळय़ात या भागात नेहमीच अशी परिस्थिती निर्माण होते. जुन्या शहरातील काही नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धांदल उडाली. याच दिवशी मतदान असल्याने अनेक जण मतदानालाही गेले नसल्याचे नागरिकांच्या चर्चेवरून दिसून आले. शहरातील सिव्हिल लाईन, म्हाडा कॉलनी, स्वराज्य कॉलनीमध्येही पाणीच पाणी झाले होते. दुसर्या दिवशीही या रस्त्यावर चिखल साचलेला होता.
पावसामुळे वाशिम शहरातील रस्ते जलमय
By admin | Updated: October 17, 2014 00:42 IST