शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बहुतांश आधार नोंदणी संच निकामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:26 IST

वाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. 

ठळक मुद्देनोंदणी प्रक्रियेत अडथळे नवीन मशीन देण्याबाबत शासनाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाने साधारणत: पाच वर्षांपूर्वी जिल्ह्याला ८0  आधार नोंदणी संच दिले होते. मात्र, सन २0१४ मध्ये  वाशिममधील एका संस्थेला दिलेले २६ संचांचा अद्याप मेळ  लागला नसून उर्वरित ५४ पैकी २0 संच यवतमाळ जिल्ह्याला  देण्यात आले; तर उर्वरित ३४ संच बहुतांशी ‘भंगार’ झाले आहे त. त्यामुळे आधार नोंदणी प्रक्रियेत अनेक अडथळे उद्भवत  असून, नागरिकांसोबतच आधार कार्ड तयार करून देणारे  महा-ऑनलाइन सेतू सुविधा केंद्रांचे संचालकही हैराण झाले  आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आजमितीस जिल्ह्यातील एकूण  लोकसंख्येच्या ९६ टक्के नागरिकांना आधार कार्ड तयार करून  देण्यात आले आहेत. मात्र, आधार कार्ड नोंदणी मोहिमेदरम्यान  राबविण्यात आलेल्या प्रक्रियेदरम्यान नावात चुका झाल्या असून,  अनेकांची जन्मतारीख, रहिवासी पत्ते चुकीचे नोंदविल्या गेले.  यासह विविध स्वरूपातील गंभीर चुका झाल्या असून, त्याची  दुरुस्ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. परिणामी, सुमारे ५0 ट क्के नागरिकांच्या आधार कार्डांमध्ये विविध स्वरूपातील त्रुटी  राहिल्याने कार्ड जवळ असतानाही ते निरूपयोगी ठरत  असल्याची अनेक उदाहरणे सभोवताल घडत आहेत. त्यामुळे  शासकीय आकडेवारीनुसार जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीचे  प्रमाण ९६ टक्के दिसत असले, तरी बिनचूक नोंदणी केवळ ४६  टक्क्यांच्याच आसपास असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आधार कार्डांपासून अद्याप वंचित असलेले नागरिक,  शालेय विद्यार्थी, नवजात बालकांचे आधार कार्ड तयार करून  देण्यासोबतच त्रुटींची पूर्तता करणे, आधार कार्डशी मोबाइल  क्रमांक संलग्नित करून अद्ययावत करणे, ही कामे सध्या प्रथम  प्राधान्याने केली जात आहेत. त्यानुसार, १६ सप्टेंबर २0१७ च्या  अध्यादेशानुसार रस्त्यांवरील आधार नोंदणी केंद्र बंद करून,  केवळ प्रशासकीय कार्यालयांमध्येच कायमस्वरूपी केंद्र सुरू  करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याची  अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे. मात्र, मुळातच आधार  नोंदणी संच कमी असणे आणि त्यातच ते वारंवार नादुरुस्त  होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले असून,  प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.  तथापि, आधार नोंदणी  मोहिमेत उद्भवलेल्या या अडचणींवर मात करण्यासाठी  जिल्ह्याला किमान १00 अतिरिक्त आधार नोंदणी संच मिळणे  गरजेचे आहे, असे सूत्रांनी सांगितले.

धडधाकट असताना अनेकांची दिव्यांग म्हणून नोंद!आधार नोंदणी संचामधील हाताच्या बोटांचे ठसे घेणारे  अधिकांश ‘स्कॅनर’ नादुरूस्त आहेत. त्यामुळे ‘स्कॅनर’वर हात  ठेवूनही बोटांचे ठसे नोंदणी अर्जांवर उमटत नसल्याचे प्रकार  अनेक ठिकाणी घडले आहेत. याच कारणामुळे बहुतांश  नागरिकांची नोंद चक्क दिव्यांग म्हणून झाली. असे असताना ही  गंभीर त्रुटी अद्याप दूर झालेली नाही. आजही जिल्ह्यातील  आधार नोंदणी संचांमधील ‘स्कॅनर’मध्ये हा ‘फॉल्ट’ कायम  असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आधार नोंदणी संचांचा मेळ लागेना!आधार नोंदणीचे साहित्य विहित मुदतीत परत न केल्यामुळे सन  २0१४-१५ मध्ये वाशिममधील एका संस्थेवर पोलीस कारवाई  करण्यात आली होती. सदर संस्थेकडे २६ आधार नोंदणी संच  होते, ते दरम्यानच्या काळात वाशिम शहर पोलीस ठाण्यात जमा  करण्यात आले असून, त्यातील २३ संच जिल्हा प्रशासनाकडे  हस्तांतरित करण्यात आले आहेत; तर २ संच चोरीला गेल्याची  नोंद असून, १ संच आजही संबंधित संस्थेकडे असून तो परत  घेण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्याची माहि ती निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.