शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

वाढते तापमान, पाणीटंचाईमुळे दुधाच्या उत्पादनात घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 6:56 PM

वाशिम : उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले असून, सोमवार, २६ मार्च रोजी वाशिमचे तापमान ३९.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. अशातच गावागावांत भीषण पाणीटंचाईनेही तोंड वर काढले आहे.

ठळक मुद्दे सोमवार, २६ मार्च रोजी वाशिमचे तापमान ३९.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले.ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात चाºयाचीही उगवण झाली नाही. पाणीटंचाई उद्भवल्याने दुधाच्या सरासरी उत्पादनात सुमारे २५ टक्क्याने घट झाली

वाशिम : उन्हाचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले असून, सोमवार, २६ मार्च रोजी वाशिमचे तापमान ३९.४ अंश सेल्सियस नोंदविले गेले. अशातच गावागावांत भीषण पाणीटंचाईनेही तोंड वर काढले आहे. त्याचा थेट परिणाम दुधाळ जनावरांवर होत असून, दुधाच्या सरासरी उत्पादनात सुमारे २५ टक्के घट आल्याची माहिती सूत्रांनी दिली.गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानात ३० टक्के घट झाली. यामुळे ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात चाºयाचीही उगवण झाली नाही. सोयाबिनचे उत्पन्न घटल्याने यापासून मिळणाºया कुटाराचे प्रमाणही तुलनेने कमीच राहिले. दुसरीकडे दुधाळ जनावरांचे मुख्य खाद्य म्हणून ओळख असलेल्या ढेपीचे दरही गगणाला भिडले आहेत. उद्भवलेल्या या विविध संकटांमुळे पशूपालक अक्षरश: जेरीस आले असतानाच यंदा लवकरच पाणीटंचाई उद्भवल्याने दुधाच्या सरासरी उत्पादनात सुमारे २५ टक्क्याने घट झाली असून फॅट, एस.एन.एफ.वरही त्याचा विपरित परिणाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जनावरांच्या प्रजनन प्रक्रियेतही वाढत्या उन्हामुळे आणि पाणीटंचाईमुळे विविध स्वरूपातील अडथळे निर्माण होत आहेत. या संकटामुळे पशुपालक पुरते वैतागले असून बाजारात दुधाळ जनावरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त गावांमध्ये चारा छावण्या उभारून पाणीटंचाई निवारणार्थ प्रभावी उपाययोजना कराव्या, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे. 

टॅग्स :washimवाशिम