शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टमधील अतिपावसाचा फटका; शेतमालाचा दर्जा खालावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 15:33 IST

वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतमालाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे.

ठळक मुद्देमुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतमालास अपेक्षीत भाव मिळेनासे झाले आहेत.खरेदी करण्यास व्यापारी तयार होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतमालाचा दर्जा मोठ्या प्रमाणात खालावला आहे. मुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शेतमालास अपेक्षीत भाव मिळेनासे झाले आहेत. शिवाय काही मालाची खरेदी करण्यास व्यापारी तयार होत नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत. वाशिम जिल्ह्यात यंदा आॅगस्टच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९२ टक्के पाऊस पडला. त्यातच आॅगस्ट महिन्याच्या मध्यंतरी जिल्ह्यात धो धो पाऊस कोसळला. या पावसामुळे खरीपातील पिकांना प्रामुख्याने मुग, उडिद आणि सोयाबीनच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने शेतमालाचा दर्जाही खालावला आहे. खरीपातील सर्वात कमी कालावधीची पिके असलेल्या मुग आणि उडिदाच्या काढणीवरून हे स्पष्ट झाले आहे. यामुळे शासनाने घोषीत केलेल्या हमीभावापेक्षा खूप कमी भाव शेतकºयांना मिळू लागले आहेत. त्यातच काही शेतमालाचा दर्जा एवढा खालावला आहे की, व्यापारी त्या शेतमालाची खरेदी करण्यासही तयार नसल्याचे चित्र दिसत आहे. मंगरुळपीर बाजार समितीत बुधवारी असा प्रकार पाहायला मिळाला. या बाजार समितीत एका शेतकºयाने लिलावात दोन ते अडीच क्विंटल मुग टाकला होता. मोठ्या प्रमाणात पावसाचा तडाखा बसल्याने या  मुगाचा रंग उडून चक्क धुरकट झाला होता.  दूरून पाहिल्यास वाळूचा ढीगच आहे, असे वाटत होते. त्यामुळे या मुगाचा लिलावच होऊ शकला नसून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता हा मुग फेकून देणे किंवा गुराला चारणे, एवढाच पर्याय शेतकºयापुढे उरला आहे.

टॅग्स :washimवाशिमMarket committee washimबाजार समिती वाशिमagricultureशेती