शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मुंगळा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाचा तूर पिकाला फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 18:54 IST

मुंगळा परिसरात शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी वादळवा-यासह झालेल्या पावसामुळे तूर पिकाला जबर फटका बसला आहे. तुरीच्या शेंगा व फुलांची नासाडी झाली असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देतुरीच्या शेंगा व फुलांची नासाडी शेतकरी चिंताग्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कमुंगळा (वाशिम) - मुंगळा परिसरात शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी वादळवा-यासह झालेल्या पावसामुळे तूर पिकाला जबर फटका बसला आहे. तुरीच्या शेंगा व फुलांची नासाडी झाली असल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.यावर्षी शेतक-यांना नानाविध संकटातून जावे लागत आहे. खरिप हंगामात अल्प पाऊस झाल्याने तसेच पावसात सातत्य नसल्याने मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. त्यानंतर या शेतमालाला समाधानकारक बाजारभावही मिळाले नाहीत. खरिप हंगामातील कसर भरून काढण्यासाठी शेतकरी रब्बी हंगामावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. मात्र, प्रकल्पातील अल्प जलसाठा, महावितरणची वीजजोडणी खंडित मोहिम यामुळे रब्बी हंगामातही अडथळे निर्माण होत आहेत. अशातच मुंगळा परिसरात दोन दिवसांपूर्वी वादळवा-यासह अवकाळी पाऊस झाला. यामुळे तुरीची फुले व लहान शेंगा गळून खाली पडल्या तसेच काही ठिकाणी तूरीची झाडेही वाकली. धुके पडत असल्याने तुरीची फुले व कोवळ्या शेंगांना हाणी पोहोचत असल्याचा दावा शेतक-यांनी केला आहे. काही शेतक-यांच्या तूरीला तर फुलेच राहिली नसल्याचे दिसून येते. तूरीला जबर फटका बसत असल्याने शेतक-यांची चिंता अधिकच वाढत आहे. मूग, उडीद व सोयाबीनच्या उत्पादनातील घट आणि कमी बाजारभाव यामुळे अगोदरच शेतकरी मेटाकुटीस आला आहे. आता तूरीच्या पिकालाही जबर फटका बसल्याने मूंगळा परिसरातील शेतकºयांची झोप उडाली आहे. महसूल व कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवावा, अशी मागणी शेतकºयांनी सोमवारी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती