शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

घटसर्प आजारामुळे १० गावांतील जनावरांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 15:20 IST

इंझोरी: जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे.

ठळक मुद्देपावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी दुषित होणे, चाऱ्यांवर किडीचा प्रादूर्भाव होणे असे प्रकार घडतात. सततच्या पावसामुळे गुरांवर विविध आजारांची लागण होत असून, त्यात घटसर्प या भयंकर आजाराचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनावरांवर विविध आजारांचा प्रादूर्भाव होत असतानाच इंझोरी परिसरात गुरांना घटसर्प आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे १० गावांतील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यातच या परिसरात २ वर्षांपासून पशूसंवर्धन विभागाकडून कुठल्याच प्रकारचे लसीकरण करण्यात आले नाही आणि पशूवैद्यकीय अधिकारीही फिरकले नाहीत. पावसाळ्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर पाणी दुषित होणे, चाऱ्यांवर किडीचा प्रादूर्भाव होणे असे प्रकार घडतात. याचा परिणाम गुरांवर होतो दुषित पाणी आणि किड लागलेला चारा खाण्यात गेल्याने विविध आजारांची लागण होते. इंझोरी परिसरात आता सततच्या पावसामुळे गुरांवर विविध आजारांची लागण होत असून, त्यात घटसर्प या भयंकर आजाराचा समावेश आहे. या आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच असल्याने या परिसरातील १० गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत पशू संवर्धन विभागाकडून लसीकरण मोहिम राबविण्यासह गुरांची नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे असत; परंतु पशू संवर्धन विभागाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. इंझोरी, चौसाळा, धानोरा, भोयणी, नायणी, खापरी, खंडाळा, दापुरा बु., दापुरा खुर्द, अजनी, जामदरा, तोरणाळा, उंबर्डा, म्हसणी आदि १४ गावांतील गुरांचा जीव यामुळे धोक्यात आला आहे. काही गुरे आजार बळावल्यामुळे दगावण्याच्या स्थितीत आली आहेत. त्यातच पशू संवर्धन विभागाकडून दखल न घेण्यात आल्याने पशूपालकांत संतापाची लाट उसळली आहे.दापुऱ्यातील पशू दवाखान्याचे स्थलांतर कोंडोलीतपूर्वी मानोरा तालुक्यातील इंझोरी आणि दापुरा परिसरातील हजारो पशूंच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी दापुरा येथे पशूवैद्यकीय दवाखाना सुरु करण्यात आला होता; परंतू गेल्या ९ वर्षांपासून हा दवाखाना बंद करण्यात आला असून, या परिसराचा प्रभार मानोरा तालुक्यातील कोंडोली येथे स्थलांतरीत करण्यात आला आहे. आता परिसरातील गावांसाठी हे अंत २५ किलोमीटर एवढे आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी गुरे नेणेच अशक्य होत असून, पशू संवर्धन विभाग मात्र इंझोरी परिसरात फिरकत नाही. त्यामुळे ३० हजारांहून अधिक गुरांचा जीव धोक्यात आला आहे.

टॅग्स :washimवाशिम