शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाच्या विलंबामुळे वनोजा येथील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:47 IST

वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

ठळक मुद्देखरीपाच्या पेरणीसाठी बँंकांना पीककर्ज तातडीने वितरित करण्याचे आदेश असतानाही त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. नव्याने कर्ज देणे क्रमप्राप्त असतानाही बँका वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे कारण पुढे करीत शेतकºयांना वेठीस धरीत आहेत. शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत बँकाना पीककर्ज देण्याबाबत सुचित करण्याची मागणी करणारे निवेदनच सादर केले आहे.

वाशिम: नागपूर-मुंबई महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसी कायद्यानुसार २०१६-१७ चे कर्ज भरूनही बँंकांकडून त्यांना नव्याने पीककर्ज देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील शेतकरी ऐन खरीप पेरणीच्या वेळेत हवालदिल झाले आहे. या संदर्भात शेतकºयांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत बँकाना पीककर्ज देण्याबाबत सुचित करण्याची मागणी करणारे निवेदनच सादर केले आहे.ंयंदाच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी उसणवारी करून घाईत पेरणी उरकली असली तरी, अद्याप ७० टक्के शेतकरी पेरणीसाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. बियाणे, खतांसाठी पैसा नसल्याने त्यांच्याकडून बँंकांकडे पीककर्जाची मागणीही केली आहे. यामध्ये नागपूर-मुंबई महामार्गासाठी जमीन देणाºया वनोजा येथील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. आता खरीपाच्या पेरणीसाठी बँंकांना पीककर्ज तातडीने वितरित करण्याचे आदेश असतानाही त्यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी एमएसआरडीसीच्या कायद्यानुसार २०१६-१७ च्या कर्जाची फेड केली. त्यांना नव्याने कर्ज देणे क्रमप्राप्त असतानाही बँका वरिष्ठ स्तरावरून आदेश नसल्याचे कारण पुढे करीत शेतकºयांना वेठीस धरीत आहेत. या प्रकारामुळे वनोजा येथील शेतकरी हताश झाले असून, त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आपली समस्या जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे मांडली आहे. पीककर्ज देण्यासाठी बँकांना सुचित करावे, अशी मागणी त्यांनी केली असून, याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. या निवेदनावर वनोजा येथील ५० शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय