शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे वाशिम जिल्ह्यातील तुरीचे पिक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 15:56 IST

 वाशिम: जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, फुलांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प्रयोग करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात यंदा ५७ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रावर तूर ...

ठळक मुद्दे ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नाही.किडींचाही प्रादूर्भाव पिकावर झाला आहे.

 

वाशिम: जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक संकटात सापडले आहे. अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडींचा प्रादूर्भाव वाढला असून, फुलांची मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प्रयोग करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. 

जिल्ह्यात यंदा ५७ हजार ७७३ हेक्टर क्षेत्रावर तूर पिकाची पेरणी झाली आहे. सुरुवातीला अपुºया पावसामुळे संकटात सापडलेल्या या पिकाला परतीच्या पावसाने मोठा आधार दिला आणि पीक बहरले. आता हे पीक शेंगा फुलावर असतानाच गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणामुळे तूर पिकाची फुले गळणे सुरू झाले असून, पाने खानारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आदि किडींचाही प्रादूर्भाव पिकावर झाला आहे. यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची भिती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. यात शेंगा पोखरणाºया अळीवर नियंत्रणासाठी किटकनाशक फवारणीचा पर्याय असला तरी, ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबविण्यासाठी कोणताही पर्याय नसल्याने पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची भिती निर्माण झाली आहे. आता ढगाळ वातावरण निवळल्यानंतर धुके पडण्यास सुरुवात झाली, तर या पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे शेतकºयांमागील नैसर्गिक संकटाचे दुष्टचक्र कायमच असल्याचे स्पष्ट होत आहे.