शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अचूक खात्याअभावी शिष्यवृत्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 13:59 IST

बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड क्रमांकात त्रूट्या असल्याने लाखो रुपयांची रक्कम गत साडेतीन वर्षांपासून बँकेतच पडून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : समाजकल्याण विभागाच्यावतीने मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती जिल्ह्यातील ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मिळाली नाही. बँक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड क्रमांकात त्रूट्या असल्याने लाखो रुपयांची रक्कम गत साडेतीन वर्षांपासून बँकेतच पडून आहे.समाजकल्याण विभागाच्यावतीने इयत्ता पाचवी ते दहावीतील पात्र विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले, मॅट्रिक पूर्व, अस्वच्छ व्यवसाय यासह विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. यासाठी संबंधित विद्यार्थ्यांकडून योग्य त्या प्रस्तावासह बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड आदींची माहिती संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी समाजकल्याण विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अचूक बँंक खाते क्रमांक तसेच आयएफएससी कोड समाजकल्याण विभागाकडे प्राप्त नसल्याने शिष्यवृत्ती रखडली आहे. एकूण अडीच हजार विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक प्राप्त नव्हते. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर शिक्षण विभागामार्फत अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक प्राप्त झाले. अद्याप ७०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या बँक खाते क्रमांकाची प्रतिक्षा आहे. तीन वर्षांपूर्वी इयत्ता नववी व दहावीत असणारे परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थी जिल्ह्याबाहेर गेल्याने, त्यांचा शोध घेण्याची कसरत करावी लागत आहे.

जिल्हा परिषदेच्या सभेतही गाजला होता मुद्दाविद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तातडीने द्यावी यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा तसेच स्थायी समितीच्या सभेतही प्रश्न उपस्थित झालेले आहेत. मध्यंतरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर तालुकास्तरीय शिक्षण विभागाकडून १६०० ते १७०० विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक प्राप्त झाले. उर्वरीत विद्यार्थ्यांनी अचूक बँक खाते क्रमांक सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाने केले.

टॅग्स :washimवाशिमScholarshipशिष्यवृत्ती