शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात रखरखत्या उन्हामुळे डाळिंब बागा सुकल्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 16:29 IST

वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत.

ठळक मुद्देकेळी, संत्रा, पपई, निंबू, डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. भूजल पातळी दोन मीटरने खालावली असून, जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक धरणांतील गाळही आता सुकत चालला आहे.त्यातच उन्हाचा पाराही ४३ अंशांपेक्षा वरच असल्याने उभ्या फळबागा सुकत आहेत.

वाशिम: उन्हाचा पारा ४३ अशांच्यावर पोहोचला असतानाच पुरेसे पाणी नसल्यामुळे डाळिंबाच्या अनेक बागा सुकल्यात आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शासनाने या नुकसानीपोटी आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे. वाशिम जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र लक्षणीय आहे. केळी, संत्रा, पपई, निंबू, डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आहे. आर्थिक उन्नतीसाठी फळबाग लागवडीचा आधार घेणाऱ्या फळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मात्र उन्हाचा चांगलाच फटका बसला आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत पर्जन्यमानाचे प्रमाण दिवसेंदिवस खालावत आहे, तर पाण्याचा उपसा वारेमाप सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी दोन मीटरने खालावली असून, जिल्हाभरातील ६० पेक्षा अधिक धरणांतील गाळही आता सुकत चालला आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यातच उन्हाचा पाराही ४३ अंशांपेक्षा वरच असल्याने उभ्या फळबागा सुकत आहेत. याचा सर्वाधिक फटका केळी आणि डाळिंबांच्या बागांना बसत असल्याचे दिसत असून, जिल्ह्यातील २० टक्के डाळिंबाच्या बागा उन्हामुळे सुकल्या आहेत. पुरेशा पाण्याचा अभाव आणि कडक उन्ह डाळिंबांसाठी घातक ठरते. गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली असल्याने जमिनीत ओलावा उरला नाहीच शिवाय विहिरींनाही पुरेसे पाणी नसल्याने शेतकऱ्यांना डाळिंबांच्या बागा जगविणे कठीण झाले. त्यातच उन्हाचा कडाका वाढल्याने डाळिंबांच्या बागाच वाळून जात आहेत. मंगरुळपीर तालुक्यातील डिगांबर गिरी या शेतकºयाची पाच एकरातील डाळिंबाची बाग महिनाभरापूर्वीच सुकली, तर महेंद्र इंगोले या शेतकऱ्याची डाळिंबाची बागही उन्हामुळे पूर्णपणे सुकली आहे. अशा अनेक शेतकºयांच्या डाळिंबांना यंदा उन्हाचा फटका बसल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती