शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत बधिरिकरणतज्ज्ञ; सेवा समाप्तीची कारवाई

By संतोष वानखडे | Updated: February 25, 2024 20:12 IST

एका रुग्णाला सिझर करतेवेळी बधीर करण्यासाठी आय.पी.एच. एस. कार्यक्रमांतर्गत ऑन कॉल सेवा देणारे बधीरीकरण तज्ञ डॉ. सुरेश भोडणे हे दारूच्या नशेत असल्याचा प्रकार कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २४ फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आला होता.

वाशिम : कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील ऑन कॉल सेवा देणारा बधीरीकरण तज्ज्ञ मद्य प्राशन करून कर्तव्य बजावत असल्याचा ठपका ठेवत २५ फेब्रुवारी रोजी त्यांची सेवा समाप्त करण्याची कारवाइ वैद्यकीय अधीक्षक डॉ. नथुराम साळुंखे यांनी केली.

एका रुग्णाला सिझर करतेवेळी बधीर करण्यासाठी आय.पी.एच. एस. कार्यक्रमांतर्गत ऑन कॉल सेवा देणारे बधीरीकरण तज्ञ डॉ. सुरेश भोडणे हे दारूच्या नशेत असल्याचा प्रकार कारंजा उपजिल्हा रुग्णालयात २४ फेब्रुवारीला दुपारी उघडकीस आला होता. रुग्णाच्या नातेवाईकांनी हा प्रकार काही पुढाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर घडलेल्या या प्रकाराची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आली. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. साळुंखे हे बाहेरगावी असल्याने डॉ. पराग राठोड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित केले. चौकशीदरम्यान कर्तव्यावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बधीरीकरण तज्ञ हे दारूच्या नशेत नसल्याचा अहवाल दिला होता. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयाची प्रतिमा डागाळू नये म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. नथुराम साळुंखे यांनी बधीरीकरण तज्ञावर शस्त्रक्रिया गृहात मद्यप्राशन करून कर्तव्य बजावत असल्याचा ठपका ठेवत २५ फेब्रुवारीपासून सेवा समाप्तीची कारवाई केल्याची माहिती डॉ. साळुंखे यांनी दिली.महिन्याभरापूर्वीच एका डाॅक्टरवर कारवाइ -कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत एक वैद्यकीय अधिकारी २४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याप्रकरणाची चौकशी केली असता, वैद्यकीय अधिकारी हे मद्यधुंद असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर कार्यमुक्ततेची कारवाइ केली होती. आता पुन्हा कारंजा उपजिल्हा रुग्णालयात मद्य प्राशन केल्याने एका डाॅक्टरची सेवा समाप्त करण्यात आली. 

टॅग्स :alibaugअलिबाग