दादाराव गायकवाड/ वाशिम: २0 फेब्रुवारीपर्यंत दोन लाख ४0 हजार २१0 पैकी एक लाख १३ हजार ५२२ शेतकर्यांच्या बँक खात्यात दुष्काळ मदत निधी जमा करण्यात आला आहे. २0१४ मधील कोरड्या दुष्काळाच्या पृष्ठभूमीवर शेतकर्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने मदत जाहिर केलेली आहे. वाशिम जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात ५७ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या मदत निधीचे वितरण २६ जानेवारीपूर्वी करण्याचे निर्देश अमरावती विभागीय आयुक्तांनी दिल होते. मात्र, २६ फेब्रुवारीपर्यंतही दुष्काळ मदत निधीचे वितरण पूर्ण होणार नसल्याची परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी तातडीने शेतकर्यांच्या बँक खाते क्रमांकांची माहिती जमा करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठय़ांना दिल्या आहेत. गावपातळीवर पात्र शेतकरी लाभार्थ्यांच्या याद्यादेखील लावण्यात आल्या. आताही शेतकर्यांचे बँक खाते क्रमांक मिळविण्याचे काम तहसील कार्यालयांकडून सुरू आहे. २0 फेब्रुवारीपर्यंत दोन लाख ४0 हजार २१0 पैकी एक लाख १३ हजार ५२२ शेतकर्यांच्या बँक खात्यात दुष्काळ मदत निधी जमा करण्यात आला आहे. दुसर्या टप्प्यातील मदत निधी जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. २0 फेब्रुवारीपर्यंत १ लाख १३ हजार ५२२ शेतकर्यांना ७९ कोटी १३ लाख ९0 हजार १५ रुपये मदत निधी देण्यात आल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे.
४७ टक्के शेतक-यांना दुष्काळ मदत निधीचे वाटप
By admin | Updated: February 24, 2015 00:32 IST