शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

चालकांनो, आता हेल्मेट घेऊनच घराबाहेर पडा, जिल्ह्यात हेल्मेट सक्ती बुधवारपासून

By दिनेश पठाडे | Updated: February 27, 2023 15:49 IST

Helmet Compulsory Washim: वाशिम जिल्ह्यात १ मार्चपासून दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांना पुन्हा घरी पाठविले जाणार आहे.

वाशिम : जिल्ह्यात १ मार्चपासून दुचाकीचालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचा रस्ता अडवून त्यांना पुन्हा घरी पाठविले जाणार आहे. त्यामुळे बुधवारपासून हेल्मेट घेऊनच घराबाहेर पडणे हिताचे असणार आहे. जिल्ह्यातील अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे गतवर्षात समोर आले आहे. त्यामुळे या वर्षात अपघात कमी करण्यासाठी जिल्हा प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्याच धर्तीवर दुचाकीचालकांना हेल्मेट सक्ती केली जाणार आहे.

यापुढे १ मार्च २०२३ पासून वाशिम शहर व जिल्ह्यातील इतर ५ तालुक्यांतील मुख्य व इतर सर्व रस्त्यांवर दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात गत वर्षात झालेल्या एकूण अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींमध्ये ७० टक्के मृत्यू डोक्याला मार लागल्यामुळे झाले आहेत. त्यामध्ये दुचाकीचालक आणि पाठीमागे बसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाकडून मोटार वाहन नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांविरुद्धच्या कारवाईमध्ये वाढ करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी चांगल्या प्रतीचे हेल्मेट परिधान करूनच प्रवास करावा. अन्यथा सदर दुचाकी चालकावर मोटार वाहन कायद्यानुसार दंड व अनुज्ञप्ती निलंबनाची कारवाई  केली जाणार आहे. तसेच  त्यास समुपदेशन केल्यानंतर त्याला पुढील प्रवास करू न देता, परत पाठवून हेल्मेट परिधान केल्यानंतरच पुढील प्रवासाची अनुमती देण्यात येणार आहे.

कडक कारवाईचे आदेशपरिवहन विभाग कार्यालयातील वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून हेल्मेट तपासणीबाबत सध्या सुरू असलेल्या कारवाईपेक्षा कडक कारवाई करण्याचे निर्देश पथकातील कर्मचाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिले आहेत. ...तर जावे लागे पुन्हा माघारजिल्ह्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविली जाणार आहे. हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीवरील व्यक्तींना पुढे जाऊ दिले जाणार नाही. त्यांना पुन्हा घरी पाठवून हेल्मेट परिधान करुनच पुढील प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी हेल्मेट घेऊनच घराबाहेर पडावे अन्यथा पुन्हा माघारी फिरावे लागणार आहे. जिल्ह्यात १ मार्चपासून हेल्मेट सक्ती मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुषंगाने सर्व संबंधितांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, दुचाकीवर हेल्मेट परिधान करुनच प्रवास करावा अन्यथा अशांवर कारवाई केली जाईल. -ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :washimवाशिम