शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमायकोसिस’कडे दुर्लक्ष नको, वेळीच उपचार घ्या -   डॉ. मधुकर राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 17:26 IST

Mucormycosis News : वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी लोकमतसोबत संवाद साधताना केले आहे.

वाशिम : कोरोनातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) आजाराचा संसर्ग दिसून येत आहे. नागरिकांनी या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी लोकमतसोबत संवाद साधताना केले आहे.े

 

म्युकरमायकोसिस हा नेमका काय आजार आहे ?

 

म्युकरमायकोसिस हा एक प्रकारचा बुरशीजन्य आजार आहे. हा तुलनेने दुर्मिळ पण गंभीर आजार आहे. झिगॉमायकोसिस म्हणून या आजारास ओळखले जाते. एखादा आजार जडल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर हे संक्रमण बहुतेक वेळा दिसून येते. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये याचा संसर्ग जास्त प्रमाणात होतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये बाधित झालेल्यांवर उपचारा दरम्यान रेमडेसिवर, स्टेरॉईड व अँटीबायोटिक्सच्या वापराच्या दुष्परिणामामुळे त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, अवयव प्रत्यारोपण केलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार दिसून येत आहे. म्युकरमायकोसिस हा आजार म्यूकोर्मिटाईड मोल्ड्सच्या संपर्कातून उद्भवतो. हे मोल्ड्स झाडाची पाने, कंपोस्टचे ढीग, माती, सडणारे लाकूड यात आढळतात. हे प्रभावित मोल्ड श्वसन यंत्रणेस संसर्गित करतात व त्यातून म्युकरमायकोसिस आजार उद्भवतो. याला फुफ्फुसीय संसर्ग म्हणून संबोधले जाते. केंद्रीय मज्जासंस्था, डोळे, चेहरा, फुफ्फुसे, सायनस, त्वचेवरील जखम किंवा भाजलेली जखम (त्वचेच्या संसर्गातून) या माध्यमातून हे संक्रमण पसरते. भाजलेली जखम, कापलेली जखम आणि खरचटलेली जखम, कर्करोग, अलिकडील अवयव प्रत्यारोपण, मधुमेह (विशेषत: जर योग्यरित्या उपचार केला जात नसेल तर), शस्त्रक्रिया, एचआयव्ही किंवा एड्स त्वचेच्या संसर्गासह, आपल्या शरीराच्या कोणत्याही भागात म्युकरमायकोसिस संसर्गित करू शकतो. हा सुरुवातीला त्वचेच्या माध्यमातून उद्भवू शकतो. नंतर दुर्लक्ष झाल्यास गतीने दुसर्‍या भागातही हा संसर्ग पसरु शकतो.

 

या आजाराचे निदान व उपचार कसे केले जातात?

वेळीच निदान आणि उपचार केल्यामुळे या आजारामुळे होणारे संभाव्य दुष्परिणाम टाळता येतात. यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग काळात उपचारादरम्यान स्टेरॉईडचा वापर आवश्यक तेवढाच गरजेचा आहे. अतिरिक्त वापर टाळणे अत्यावश्यक. प्रतिजैविकांचा (अँटीबायोटिक्स) तारतम्याने वापर आवश्यक आहे. या आजारावरील उपचारासाठी अँटी फंगल ट्रीटमेंटची गरज असेल तर सर्जरी करुन बाधित झालेला भाग काढला जातो. यासाठी दंत शल्यचिकित्सक, ओरल आणि मॅकझिलोफ़ेशियल सर्जन, कान-नाक-घसा तज्ञ, न्यूरोसर्जन व फिजिशियन यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे डॉ. मधुकर राठोड यांनी

 

 

संसर्ग टाळण्यासाठी कशी काळजी घ्यावी?

म्युकरमायकोसिस हा संक्रमित होणारा आजार नाही. संक्रमित व्यक्तीकडून तो आजार दुसऱ्या व्यक्तीला होवू शकत नाही. या प्रकारच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी घेणे, वैयक्तिक स्वच्छतेकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रतिकारशक्ती कमी असल्यास, घराबाहेर स्वत:ला सुरक्षित ठेवणे महत्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना मास्क घातल्यास आणि पूर्ण बरे होईपर्यंत सर्व जखमांवर नियमित मलमपट्टी करीत राहिल्यास बुरशीजन्य संसर्ग रोखणे शक्य होईल. उन्हाळ्यात आणि शरद ऋतूतील महिन्यांमध्ये अतिरिक्त सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या वातावरणात बुरशीचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी. काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा.

 

 

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसwashimवाशिमinterviewमुलाखत