वाशिम: हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडरला बंदी असतानाही शासकीय कार्यालय परिसरातील हॉटेल्समध्येच घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे ह्यलोकमतह्णच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये गुरुवारी उघडकीस आले. घरगुती वापराबरोबरच सिलिंडरचा व्यावसायिक क्षेत्रातही वापर होत असल्याने ह्यघरगुती आणि व्यावसायिकह्ण असे सिलिंडरचे दोन प्रकार पाडण्यात आले आहेत. घरगुती सिलिंडरची किंमत ६५0 रुपयांच्या आसपास तर व्यावसायिक सिलिंडरची किंमत २000 रुपयांच्या आसपास आहे. गॅसची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून हॉटेल, ढाबा व इतर व्यावसायिक क्षेत्रात घरगुती सिलिंडरचा वापर करण्यावर शासनाने बंदी आणली आहे. या आदेशाची पायमल्ली करणार्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचेही शासनाने सुचविले आहे; मात्र शहरासह ग्रामीण भागातील हॉटेल्स, धाब्यामध्ये सर्रासपणे घरगुती सिलिंडरचाच वापर केला जातो. याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे शासकीय, निमशासकीय कार्यालय परिसरात असलेल्या हॉटेल्समध्येही घरगुती सिलिंडरचाच वापर होत असल्याची माहिती ह्यलोकमतह्णला मिळाली होती. याच हॉटेल्समधून अधिकारी व कर्मचार्यांना चहा, कॉफी, नाश्ता पुरविला जातो. हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याची बाब माहिती असूनही कुणीच अधिकारी याला आक्षेप घेत नाही, ही शोकांतिका आहे. पुरवठा विभागाचा समावेश असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरातील हॉटेलमध्येही घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे. कोण-कोणत्या शासकीय कार्यालय परिसरातील हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होतो, याची पडताळणी करण्यासाठी २८ जानेवारीला दुपारी ३ ते ५ वाजेदरम्यान स्टिंग ऑपरेशन केले. जिल्हाधिकारी कार्यालय, जि.प. कार्यालय, ग्रामीण पोलीस स्टेशन, पाटबंधारे व सा. बां. विभागाच्या कार्यालय परिसरातील हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे दिसून आले. काही ठिकाणी व्यावसायिक सिलिंडर असल्याचे दिसून आले; मात्र या सिलिंडरचा वापर न करता, याच सिलिंडरच्या आड घरगुती सिलिंडर ठेवल्याचे दिसून आले. या घरगुती सिलिंडरची नळी, स्टोव्ह किंवा शेगडीला जोडून काही जणांनी पळवाट शोधून काढल्याचेही दिसून आले.
शासकीय कार्यालय परिसरातील हॉटेल्समध्ये घरगुती सिलिंडर!
By admin | Updated: January 30, 2016 02:26 IST