शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:46 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस जिल्ह्यात साधारणत: १५ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. तोपर्यंत जिल्ह्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्णांचा एकूण आकडा केवळ ७ हजार ३३९ होता; मात्र गेल्या तीन महिन्यांच्या काळात त्यात तब्बल ३० हजार ९०२ (२३ मे अखेर) नव्या रुग्णांची भर पडली आहे. १५ फेब्रुवारीला केवळ १२० ॲक्टिव्ह रुग्ण होते, तर २३ मे रोजी ही संख्या ३३५७ वर पोहोचली. उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. यामुळे सतत धावपळ करावी लागत असल्याने अनेक डाॅक्टरांचे वजन कमी झाले आहे, तर काहींनी योगासन, प्राणायाम, व्यायामाद्वारे स्वत:च वजन कमी करून घेतले.

.....................

जिल्हा रुग्णालय -

डॉक्टर्सची संख्या - ३२

आरोग्य कर्मचारी - १५०

...............

कोट :

गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणू संसर्गाने बाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दुसरीकडे कोरोना चाचण्यांचेही प्रमाण वाढविण्यात आले. याशिवाय इतरही आजारांमधील रुग्णांवर नेहमीप्रमाणे उपचार करावे लागत आहेत. परिणामी, कामाचा व्याप वाढल्याने माझ्या वजनात घट झाली आहे.

- डाॅ. मधुकर राठोड

जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम

............

कोरोना संसर्गाने बाधित होणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना खासगी दवाखान्यांमधील खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे ते थेट शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होऊन उपचार घेत नसल्याने निश्चितपणे कामाचा व्याप वाढला आहे. दैनंदिन धावपळ करावी लागत असल्याने स्वत:च्या वजनात घट झाली आहे.

- डाॅ. अनिल कावरखे,

वैद्यकीय अधिकारी, जि.सा.रु., वाशिम

..............

कोरोना संसर्गाच्या काळात रुग्णांना उपचाराची दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी सातत्याने धावपळ करावी लागत आहे. यादरम्यान स्वत:ला काही धोका होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे दैनंदिन योगासन, प्राणायाम आणि इतर व्यायामांव्दारे ‘फीट’ राहण्याचा प्रयत्न करत आहे.

- डाॅ. बालाजी हरण

इन्चार्ज, ट्रू नॅट लॅब, जि.सा.रु., वाशिम

.............

(बॉक्स)

आहाराची घेतात काळजी

कोरोनाच्या संकट काळात कामाचा व्याप तुलनेने वाढलेला आहे. यामुळे ताण-तणावापासून दूर राहण्यासोबतच डाॅक्टर्स मंडळी विशेषत: संतुलित आहारावर विशेष भर देत आहेत. दररोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश, मोड आलेले कडधान्य, सफरचंद, चिकू, टरबूज, खरबूज यासारख्या फळांचे सेवन नित्य केले जात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.