शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांचा पुढाकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 13:36 IST

जनजागृतीपर माहितीपत्रके तयार केली असून, शहरातील दर्शनी भागात लावली जाणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. या कार्यात इंडियन मेडीकल असोसिएशननेही (आयएमए) पुढाकार घेत १९ मार्चपासून जनजागृती सुरू केली.कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्यापासून वेळीच सावध होत प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे. काही नागरिकांना कोरोना विषाणूसंदर्भात इत्यंभूत माहिती नसल्याने तसेच जनजागृतीचा अभाव जाणवू नये या उद्देशाने इंडियन मेडीकल असोसिएशनने जनजागृतीपर माहितीपत्रके तयार केली असून, शहरातील दर्शनी भागात लावली जाणार आहेत. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला कोरोना विषाणूपासून सावधगिरीचा प्रयत्न म्हणून काय केले पाहिजे यासंदर्भात माहिती दिली जात आहे. जेथे अत्यावश्यकता असेल आणि मास्क व अन्य साहित्य उपलब्ध नसेल तेथे मास्क उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही आयएमए संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी सांगितले.नागरिकांनी स्वत:ला व इतरांना कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. हातांची नियमित स्वच्छता राखावी. शिंकताना-खोकताना नाक-तोंडासमोर रुमाल धरावा, शक्यतोवर घराबाहेर पडू नये, असे आवाहनही आयएमए संघटनेने नागरिकांना केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात होवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आणि आवश्यक खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून इंडियन मेडीकल असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्य जनजागृती करीत आहेत. शहरात दर्शनी भागात जनजागृतीपर माहितीपत्रक लावले जाणार असून, प्रत्येक हॉस्पिटलमध्येही कोरोना विषाणूसंदर्भात उपयुक्त माहिती देऊन अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले जात आहे.-डॉ. अनिल कावरखेजिल्हाध्यक्ष, आयएमए वाशिम

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर