शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

वयाच्या चाळिशीनंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 11:08 IST

Doctor's certificate required to get a driving license after the age of 40 : एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरचेच ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणे अधिक सोयीचे व्हावे याकरिता परिवहन विभागाने ऑनलाइन पद्धती अमलात आणली आहे. घरबसल्या ऑनलाइन लायसन्स काढले जात असून, वयाच्या चाळिशीनंतर वाहन परवाना काढायचा असेल किंवा त्याचे नूतनीकरण करायचे असेल तर एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरचेच ऑनलाइन प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.लर्निंग लायसन्स काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून ऑनलाइन पद्धती अमलात आणली आहे. दैनंदिन सरासरी ३५ ते ४० ऑनलाइन लर्निंग लायसन्स दिले जातात. 

लर्निंग लायसन्स ऑनलाइन!  सारथी पोर्टलवर जाऊन उमेदवारांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेले नियमानुसार शुल्क भरून ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर ऑनलाइन परीक्षा घेऊन लर्निंग ऑनलाइन लायसन्स काढता येते.  दैनंदिन सरासरी ३५ ते ४० लर्निंग लायसन्स दिले.

१८ वर्षांनंतर मिळते लायसन्सnवाहन चालविण्याचा परवाना घेण्यासाठी संबंधित उमेदवाराने वयाचे १८ वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे. १८ वर्षांनंतर कुणीही लायसन्स काढू शकतो. वाहन चालविण्याकरिता उमेदवार फिट असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले असणे आवश्यक आहे. 

एका डॉक्टरला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार वयाच्या चाळिशीनंतर लायसन्स काढण्याकरिता एमबीबीएस डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार असल्याचे पत्र परिवहन विभागाने आरटीओला पाठविले आहे. आरटीओकडे इच्छुक डॉक्टरांनी संपर्क केला तर त्यांना आरटीओच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र देण्याकरिता युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहे.  एका डॉक्टराला दिवसाला २० प्रमाणपत्र देता येणार आहेत.

आता घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने लर्निंग लायसन्स काढता येणार आहे. वयाच्या चाळिशीनंतर एमबीबीएस डॉक्टरांचे तपासणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र लायसन्स काढताना बंधनकारक लागणार आहे. दिवसाला सरासरी ३५ ते ४० ऑनलाइन लर्निंग लायसन्स दिले जातात.                - ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम.

टॅग्स :washimवाशिमRto officeआरटीओ ऑफीस