शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना वेळेचा विसर

By admin | Updated: June 6, 2017 01:06 IST

रुग्णांची हेळसांड: बहुतेक कक्ष उघडतात उशिरा

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: विविध आजारांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांची उशिरापर्यंत प्रतिक्षा करावी लागत असल्याची बाब सोमवारी लोकमतकडून करण्यात आलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उघड झाले आहे. सांयकाळी ५ वाजता या ठिकाणी ओपीडी आणि इतर एक दोन कक्ष वगळता बहुतेक कक्षात डॉक्टर किंवा संबंधित कर्मचारीच उपस्थित नसल्याचे दिसून आले. गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी शासनाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाभरातील विविध ठिकाणचे रुग्ण उपचारासाठी येतात. आजारावर उपचार व्हावा, डॉक्टरांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावे, अशी त्यांची रास्त अपेक्षा असते. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यासाठी वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. डॉक्टरांच्या वेळाही निश्चित करण्यात आल्या आहेत. सकाळच्या सत्रानंतर सायकांळच्या सत्रात ५ वाजतापासून बाह्यरुग्ण कक्ष (ओपीडी)सह औषधी वितरण कक्ष, तपासणी कक्षासह इतर कक्ष सुरू केले जातात. त्यासाठी नियोेजित वेळेत आपली तपासणी होऊन उपचार करण्यात यावे म्हणून अनेक रुग्ण रुग्णालयाच्या आवारात आधीपासूनच प्रतिक्षा करीत असतात. हा क्रम नित्यु सुरू आहे, की नाही याची पडताळणी करण्यासाठी लोकमतच्या चमूकडून सोमवार ५ जून रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्टिंग आॅपरेशन करण्यात आीले. त्यावेळी नेहमीप्रमाणे अनेक रुग्ण संबंधित डॉक्टर व इतर रुग्णांची प्रतिक्षा करीत होते. नियोजित वेळी ओपीडीसाठी रुग्णांची नोंदणीही सुरू झाली; परंतु रुग्ण नोंदणी कक्ष आणि इतर एक दोन कक्ष वगळता काही कक्ष बंद होते. तपासणी कक्षाबाहेर अनेक रुग्ण चिठ्ठ्या हाती घेऊन डॉक्टर लोकांची प्रतिक्षा करताना दिसले, तर काही रुग्ण औषध वितरण कक्षासमोर प्रतिक्षा करीत असलेले आढळले. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांना वेळेचे भान नसल्याचे स्पष्ट झाले. त्याचा फटका मात्र रुग्णांना सहन करावा लागत आहे.