लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा येथील ‘नीमा’ संघटनेशी संलग्नित डॉक्टरांनी आपापले दवाखाने कडेकोट बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला.निती आयोगाव्दारे पारित करण्यात आलेल्या ‘एनसीआयएसएम’ या विधेयकामुळे भारतीय चिकित्सा पद्धती जीवंत ठेवणाºया डॉक्टरांना त्यांचे अनेक कायदेशीर अधिकार गमवावे लागणार आहेत. त्यामुळे विधेयकास विरोध दर्शवित ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कडकडीत बंद आणि दिल्ली येथे मोर्चा काढला जाणार आहे. त्यानुसार, ‘नीमा’ संघटनेशी संलग्नित वाशिम, रिसोड, मानोरा येथील डॉक्टरांनी रविवारी दवाखाने बंद ठेवून संपात सहभाग नोंदविला होता; तर सोमवारी मालेगाव, मंगरूळपीर, कारंजातील डॉक्टरांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला.
‘नीमा’ संघटनेशी संलग्नित डॉक्टरांचा कडकडीत बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 19:37 IST
वाशिम: आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांच्या ‘निमा’ संघटनेने प्रस्तावित ‘एनसीआयएसएम’ विधेयकाविरूद्ध ६ नोव्हेंबरला देशव्यापी संप पुकारला असून सोमवार, ५ नोव्हेंबर रोजी मालेगाव, मंगरूळपीर आणि कारंजा येथील ‘डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवून आंदोलनात सहभाग नोंदविला.
‘नीमा’ संघटनेशी संलग्नित डॉक्टरांचा कडकडीत बंद!
ठळक मुद्देरुग्णांची गैरसोयएनसीआयएसएम विधेयकास विरोध