शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील सुविधांसाठी शासनाकडून निधीच  मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 01:20 IST

गोरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक  न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्‍या वसतिगृहांमध्ये  अपेक्षित मुलभूत सोयी-सुविधांसाठी आवश्यक  असलेला निधीच गेल्या दीड ते दोन वर्षांपासून  मिळालेला नाही, अशी स्पष्टोक्ती वाशिम येथील  सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त माया  केदार यांनी दिली. यामुळे मात्र उद्भवलेल्या  असुविधांमुळे विद्यार्थी वैतागले असून वसतिगृहांचा मूळ  उद्देशच भरकटत असल्याचे दिसून येत आहे. 

ठळक मुद्देसहायक उपायुक्तांची स्पष्टोक्ती असुविधांमुळे विद्यार्थी वैतागले!

सुनील काकडे। लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गोरगरिब कुटूंबातील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक  न्याय विभागाकडून चालविल्या जाणार्‍या वसतिगृहांमध्ये  अपेक्षित मुलभूत सोयी-सुविधांसाठी आवश्यक  असलेला निधीच गेल्या दीड ते दोन वर्षांपासून  मिळालेला नाही, अशी स्पष्टोक्ती वाशिम येथील  सामाजिक न्याय विभागाच्या सहायक उपायुक्त माया  केदार यांनी दिली. यामुळे मात्र उद्भवलेल्या  असुविधांमुळे विद्यार्थी वैतागले असून वसतिगृहांचा मूळ  उद्देशच भरकटत असल्याचे दिसून येत आहे. वाशिम येथील शासकीय बहुउद्देशिय संमिश्र अपंग केंद्रात  वास्तव्याला असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना मुलभूत  सुविधा पुरविण्याकामी प्रशासन सपशेल अपयशी ठरले  आहे. हात, पाय यासह इतर शारिरीक व्याधींनी त्रस्त  असतानाही जीवन जगण्याची धडपड करणार्‍या या  विद्यार्थ्यांना गाळ साचलेल्या सिमेंटच्या टाक्यात  साठविल्या जाणारे विहिरीचे अशुद्ध पाणी प्यावे लागत  असून  वसतिगृहात साधे ‘वॉटर फिल्टर’ अद्याप  लावण्यात आलेले नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांना  शौचालयांअभावी पायर्‍या उतरून बाहेर उघड्यावर  शौचास जावे लागते, झोपण्याकरिता असलेल्या पलंगांची  मोडतोड झाली असून गाद्या प्रचंड प्रमाणात मळालेल्या  आहेत. हा सर्व गंभीर प्रकार ‘लोकमत’ने ३ सप्टेंबर रोजी  ‘स्टिंग ऑपरेशन’च्या माध्यमातून उजागर केला.दरम्यान, यासंदर्भात वाशिम येथील सामाजिक न्याय  विभागाच्या सहायक उपायुक्त केदार यांच्याशी चर्चा  केली असता, गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वस ितगृहांमध्ये सुविधा पुरविण्यासाठी लागणारा निधीच  शासनाकडून प्राप्त झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.  यासंदर्भातील प्रस्ताव वेळावेळी शासनाकडे सादर  करण्यात आले आहेत; परंतू त्यावर अद्याप कुठलाच  निर्णय झाला नसल्याचेही त्या म्हणाल्या. असे असले तरी  पिण्याच्या पाण्यात पाणी निर्जंतूकीकरणाचे द्रावण  टाकण्याच्या सूचना वसतिगृह अधिक्षकांना देण्यात  आल्या असून वसतिगृहामध्ये शौचालय उभारण्याची  बाबही प्रस्तावित असल्याची माहिती त्यांनी यावेळी  दिली.