शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

दिवाळीत रेल्वे, ट्रॅव्हल्सचीही दिवाळी

By admin | Updated: October 23, 2014 01:05 IST

खासगी लक्झरी बसेसचे भाडे महागले.

शिखरचंद बागरेचा /वाशिमदिवाळीचा सण म्हटला की ,बाहेरगावी वास्तव्य करणार्‍यांना राहत्या गावी जाण्याची ओढ लागलेली असते तर लहान बालकांची मामाच्या गावाला जायची लगबग सुरु असते. या अनुषंगाने रेल्वेगाडी असो अथवा खासगी लक्झरी ट्रॅव्हल्स जे मिळेल, त्या वाहनाने प्रवासी जातात. नेमकी हीच बाब रेल्वे व खासगी लक्झरीच्या पथ्यावर पडत आहेत. दिवाळीच्या मोसमात रेल्वे व खासगी लक्झरींची दिवाळीच साजरी होत आहे. सर्वच गाड्यांचे आरक्षण फुल्ल आहे.दिवाळी व भाऊबिज निमित्त सर्वांचीच आपापल्या गावांना जाण्यासाठी घाई असते. गत तीन दिवसांपासून दिवाळी साजरी करण्यासाठी रेल्वे व खासगी लक्झरी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. रेल्वे आणि लक्झरी बसेसमध्ये आरक्षणही फुल्ल झाले असल्याचे दिसून येते. कुटूंबासह गावी जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून प्रत्येक जन रेल्वे व ट्रॅव्हल्सचे आगावू तिकीट काढून आरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असतो.वाशिम जिल्ह्याचा विचार करता, रेल्वे स्टेशन आणि खासगी लक्झरींचे आरक्षण फुल आहे. दिवाळीची गर्दी कॅश करण्याबरोबरच लक्झरी बसेसने भाड्यातही दामदुप्पट वाढ केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे. मात्र, गावी जाण्याच्या धावपळीत अतिरिक् त भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.दक्षिण मध्य रेल्वे लाईनवर असलेल्या वाशिम रेल्वे स्थानकावरुन उत्तर व दक्षिण दिशांच्या माध्यमाने देशाच्या चारही दिशेला जाता येते. येथून अकोला, नागपूर, पुर्णा, नांदेड, हैद्राबाद, काचिगुडा, सिंकदराबाद, हैद्राबाद, यशवंतपुर, इंदौर, गंगानगर, अजमेर, जयपूर, अमृतसर, आदी ठिकाणी जाता येते. रेल्वे विभागाच्या पुर्व, पश्‍चिम, उत्तर, दक्षिण या भागात जाणार्‍या जवळपास सर्वच रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून या गाड्यांच्या आरक्षणासाठी वेटींग लीस्ट लागली आहे.*परतीचा प्रवासही महागणारखासगी लक्झरी बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना मुंबई, पुणे या शहरातून वाशिम जिल्हय़ात आगमन करताना सध्या ६५0 ते ७५0 रुपये भोड मोजावे लागत आहे. मात्र दिवाळी नंतर पुन्हा या शहरांकडे जाणार्‍या प्रवाशांना दुप्पट भाडे म्हणजे १३00 ते १४00 रुपये मोजावे लागणार आहेत. येतानाचा स्वस्त झालेला प्रवास परत जाताना महाग पडणार आहे.