शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग मंगेशचे गावासाठी कायपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST

वाशिम : जीवनात काही करण्याची जिद्द असली की, मनुष्य काहीही करण्यास धजावताे. असाच काहीसा प्रकार भूमिहीन असलेल्या व ...

वाशिम : जीवनात काही करण्याची जिद्द असली की, मनुष्य काहीही करण्यास धजावताे. असाच काहीसा प्रकार भूमिहीन असलेल्या व मजुरीवर आपले कुटुंब चालविणाऱ्या दिव्यांग मंगेशनेही एक हात नसताना, गावात लाेकसहभागातून हाेत असलेल्या कामात हातभार लावून ‘गावासाठी कायपण’ची प्रचिती दाखविली.

मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम तपाेवन हे गाव पाणी फाउंडेशनमध्ये असल्याने, तसेच नुकतेच गावात समाज मंदिराचे काम लाेकसभागातून करण्यात येत आहे. यामध्ये येथीलच ३२ वर्षीय दिव्यांग तरुण मंगेश अशाेक सावळे याला एक हात नसतानाही कुदळीने खड्डा खाेदताना दिसून येत असल्याने, अनेक धडधाकट व्यक्तिंना लाजवेल, असे कार्य करीत आहे. मंगेशकडे काेणत्याच प्रकारची शेतजमीन नसल्याने ताे माेलमजुरी करून आपल्या कुटुंबातील पत्नी, ५ व ७ वर्षीय मुलगा मुलगी यांचे कुटुंब चालविताे. ६ वर्षांपूर्वी ट्रॅक्टरवरील थ्रेशर मशीनमध्ये हात गेला, तरीही हार न मानता संघर्ष करीत आपली व आपल्या कुटुंबाचा भार उचलताेय. गावातील काेणत्याही कार्यात मंगेश स्वत:हून हिरारीने भाग घेत असल्याचे तपाेवनचे सरपंच शरद पाटील येवले यांनी सांगितले. गावात सुरू असलेल्या समाज मंदिराचे काम चालू असताना एका हाताने टिकास चालवता येत नसल्याने खचून न जाता, जिद्दीने एका हाताने सब्बल घेऊन लाेकसहभागात सहभागी झाला. त्याला पाहून अनेक जण मंगेशचे काैतुक केल्याशिवाय राहत नाहीत.

........................................

मंगेशचा व्हिडीओ व्हायरल; अनेकांकडून काैतुक

साेशल मीडियावर मंगेशचा एका हाताने सब्बलद्वारे खड्डे खाेदण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण त्याला लाइक व शेअर करून कार्याचा गैारव करीत आहेत.

..............................