शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

शेलुबाजार येथील भाजीबाजाराची विभागणी; गर्दी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 15:04 IST

गर्दीवर पर्याय म्हणून सदर दुकाने आता बैलबाजाराच्या आवारात सुरक्षित अंतरावर थाटली आहे.

शेलुबाजार (वाशिम) : गर्दी टाळण्यासाठी प्रमुख शहरांसह गावातील आठवडी बाजार अन्यत्र हलविले जात आहेत. शेलुबाजार येथील मुख्य चौकातील बाजार आठवडी बाजारातील बैलबाजाराच्या आवारात २९ मार्च रोजी हलविण्यात आल्याने गर्दी टळली आहे.जिल्हा, तालुका व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनातर्फे कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. गर्दी कमी करण्याचे आवाहन प्रत्येकाला केले जात असून, शेलुबाजार येथील मुख्य चौकातील गर्दी हटविण्यासाठी येथील येथील भाजी विक्री दुकाने महसुल विभाग व ग्राम पंचायतच्या पुढाकाराने येथील आठवडी बाजारातील बैलबाजाराच्या आवारात हलविण्यात आली. भाजीपाला व फळाची दुकाने २० बाय २० जागेत थाटून ४ फुट अंतरावर ग्राहक उभा राहील अशी व्यवस्था करण्यात आली. भाजी विक्री दुकानांमुळे संचारबंदी असूनही शेलुबाजार चौकात गर्दी होत होती. या गर्दीवर पर्याय म्हणून सदर दुकाने आता बैलबाजाराच्या आवारात सुरक्षित अंतरावर थाटली आहे. त्यामुळे गर्दीला आळा बसला आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या सुचनेचे पालन नागरिकांनी केल्यास कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. नागरिकांनी कोणत्याच अफवेवर विश्वास न ठेवता आपल्या गरजेच्या वस्तू, भाजीपाल्याची खरेदी झाल्यानंतर तातडीने घरी परत जावे, भाजीबाजारात एकट्यानेच यावे, गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने केले.

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस