शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात सर्वदूर बरसल्या मृगधारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 15:42 IST

वाशिम : मृगातील पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून शेतकºयांना सुखद   धक्का दिला.

ठळक मुद्दे शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. वाशिम शहरातही सकाळी वाजताच्या सुमारास सुमारे २० मिनिटे पाऊस झाला. मंगरूळपीर, मालेगाव, रिसोड तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला.

वाशिम : मृगातील पावसाने शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून शेतकºयांना सुखद   धक्का दिला. यादरम्यान काहीठिकाणी घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. खरीप हंगामासाठी हा पाऊस निश्चितपणे फायदेशीर ठरणार असल्याचा दावा शेतकºयांनी केला.

जिल्ह्यात गतवर्षीच्या पावसाळ्यात सरासरी पर्जन्यमानात सुमारे ३० टक्के घट झाली होती. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविलेला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तुर्तास तरी समाधानाचे वातावरण असल्याचे दिसून येते. शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वाशिम शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. वाशिम तालुक्यातील कोंडाळा महाली परिसरात सकाळी ८.३० वाजतादरम्यान धो- धो पाऊस बरसला. शेतातही पाणी साचले. मंगरूळपीर शहरासह तालुक्यात दमदार पाऊस झाला. वाशिम शहरातही सकाळी वाजताच्या सुमारास सुमारे २० मिनिटे पाऊस झाला. योजना कॉलनी क्रमांक एकमध्ये पावसाचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली.गत १५ वर्षांपासून विकासापासून कोसोदूर राहिलेल्या या कॉलनीकडे ग्रामपंचायतने लक्ष देणे अपेक्षीत आहे. रस्त्यावर साधा मुरूमही टाकला नसल्याने सर्वत्र पाणी साचल्याचे दिसून येते. मालेगाव, रिसोड तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. पावसाच्या सरी कोसळल्याने जनजीवन सुखावले आहे. खरीप हंगामातील पेरणीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत असल्याचे शेतकºयांमधून बोलले जात आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीरmonsoon 2018मान्सून 2018