शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 22:23 IST

वाशिम: शासनाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या राऊंडमध्ये २४ मार्चपर्यंत ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर पहिल्या लॉटरी राऊंडमध्ये अर्जांतील चुकांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्दही झाले आहेत.

ठळक मुद्देपहिली फेरीअर्जांतील चुकांमुळे अनेकांचे प्रवेश रद्द 

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम: शासनाच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या राऊंडमध्ये २४ मार्चपर्यंत ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, तर पहिल्या लॉटरी राऊंडमध्ये अर्जांतील चुकांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्दही झाले आहेत.

शासनाच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत वाशिम जिल्ह्यात १०२ शाळांतील ११७३ जागांसाठी ११६३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी आॅनलाइन अर्ज केले होते. या अर्जांतून विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी पहिली लॉटरी प्रक्रिया वाशिम येथील समर्थ इंग्लिश स्कूलमध्ये १४ मार्च रोजी पार पडली. यात निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना शिक्षण विभागाच्यावतीने मोबाईलवर मेसेज पाठवून २४ मार्चपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह त्यांच्या पाल्याची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पालकांनी कागदपत्रांची जुळवाजुळव करून पाल्यांच्या प्रवेशासाठी धडपड सुरू केली. शासनाच्या संकेतस्थळावर २४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ११२ विद्यार्थ्यांचा प्रवेश संबंधित शाळांमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पहिल्या लॉटरी प्रक्रियेत अनेक विद्यार्थ्यांची निवड होऊनही आॅनलइन अर्जावर टाकेला पत्ता आणि आधारकार्डवर असलेला पत्ता न जुळणे, कागदपत्रांची  पुर्तता नसणे, कागदपत्रांत त्रुटी असणे अशा विविध कारणांमुळे त्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागल्याचा प्रकारही घडला आहे. 

टॅग्स :washimवाशिमRight To Educationशिक्षण हक्क कायदा