शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा  क्षयरोग कार्यक्रम समन्वयक पदाची मुलाखत ऐन वेळेवर रद्द! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 17:43 IST

वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णाालयात असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक (डिस्ट्रीक्ट प्रोग्रॅम कोआॅर्डिनेटर) पदासाठी १३ एप्रिल रोजी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देजिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतिने मुलाखतीस पात्र ठरलेल्या १३ उमेदवारांना १३ एप्रिल रोजी वाशिम येथे बोलाविण्यात आले होते. बहुतांश उमेदवार आपल्या गावाहून सकाळी ९ वाजता हरज राहण्याच्या दृष्टीने पहाटेच घरुन निघालेत.प्रतिक्षेत असतानाच काहीही कारण न सांगता मुलाखती रद्द करण्यात आल्याच्या सुचना देण्यात आल्यात.

- नंदकिशोर नारे

वाशिम : जिल्हा सामान्य रुग्णाालयात असलेल्या जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी जिल्हा कार्यक्रम समन्वयक (डिस्ट्रीक्ट प्रोग्रॅम कोआॅर्डिनेटर) पदासाठी १३ एप्रिल रोजी मुलाखती ठेवण्यात आल्या होत्या. परंतु सदर मुलाखती ऐन वेळेवर रद्द केल्याने उमेदवारांची चांगलीच तारांबळ उडाली व त्यांनी रोष व्यक्त केला. 

जिल्हा कार्यक्रम समन्वयक या  एका पदासाठी जिल्हा क्षयरोग केंद्राच्यावतिने मुलाखतीस पात्र ठरलेल्या १३ उमेदवारांना १३ एप्रिल रोजी आपल्या सर्व मुळ कागदपत्रासहीत सकाळी ९ वाजता स्व. वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद वाशिम येथे बोलाविण्यात आले होते. यामध्ये अकोला, नांदेड, कारंजासह ईतर ठिकाणच्या डॉ. रोहन हरिप्रसाद तिवारी,  रामेश्वर गणेश गिरी, डॉ. रंजीत पंजाबराव सरनाईक,  आनंदा महाजन तुपेकर, वृषाली डिगांबर देशमुख, समाधान दत्ताभाऊ लोणसुणे, डॉ. सोनु हिरामन हडके,  महेंद्र श्रीपत मनवर, मोहन प्रभाकर देशमुख,  प्रमोद श्रीकांत तुरेराव, सचित भारत गोटे,  अमोल काशिनाथराव बांगर, सचिन श्यामराव कुळकर्णी या उमेदवारांचा समावेश होता. यातील बहुतांश उमेदवार आपल्या गावाहून सकाळी ९ वाजता हरज राहण्याच्या दृष्टीने पहाटेच घरुन निघालेत. मुलाखतीसाठी वेळ होवू नये याकरीता मुलाखत स्थळी ताटकळत बसले होते. मुलाखत आता होईल मग होईल या प्रतिक्षेत असतानाच काहीही कारण न सांगता मुलाखती रद्द करण्यात आल्याच्या सुचना देण्यात आल्यात. उमेदवारांनी विचारणा केली असता कोणी काहीच उत्तर न दिल्याने हताश होवून उमेदवार घरी परततले. 

 

जिल्हा क्षयरोग केंद्रासाठी आज १३ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदासाठी उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. अपरिहार्य कारणामुळे पूर्ण समिती सदस्य उपस्थित राहु न शकल्याने  सदर मुलाखती  पुढे ढकलण्यात आल्यात. पुढे घेण्यात येत असलेल्या मुलाखतीची तारीख व वेळ उमेदवारांना कळविण्यात येणार आहे.   

 - सुधाकर जिरवणकर , प्रभारी जिल्हा क्षयरोग अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद