शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात महिनाभरातच ४६ टक्के पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 12:58 IST

वाशिम: गतवर्षी वाशिम जिल्ह्यावर रुसलेला वरूण राजा यंदा मात्र चांगलाच बरसत आहे. जिल्ह्यात यंदा मान्सूनला सुरुवात झाल्यापासून अवघ्या महिनाभरातच वार्षिक सरासरीच्या ४६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्दे पावसाने १८ जूनपासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यंदा प्रामुख्याने मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात पावसाची सरासरी अधिक आहे. वाशिम तालुक्यात ४१.१९ टक्के, तर रिसोड तालुक्यात ४१.०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गतवर्षी वाशिम जिल्ह्यावर रुसलेला वरूण राजा यंदा मात्र चांगलाच बरसत आहे. जिल्ह्यात यंदा मान्सूनला सुरुवात झाल्यापासून अवघ्या महिनाभरातच वार्षिक सरासरीच्या ४६ टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे पिक परिस्थिती उत्तम झाली असून, भूजल पातळीतही यामुळे वाढ होण्यास आधार मिळणार आहे.वाशिम जिल्ह्यात गत काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. याचा परिणाम कृषी उत्पादनावर आणि पर्यायाने आर्थिक स्थितीवर होत आहे. गतवर्षी वाशिम जिल्ह्यात केवळ ८४ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्हावासियांना गत १० वर्षांतील सर्वात भीषण अशा पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागला. खरीपाचा हंगाम होरपळला, रब्बीची पेरणी घटली. यामुळेच दुष्काळी स्थिती निर्माण झाली. आता यंदा मात्र वाशिम जिल्ह्यात बºयापैकी पाऊस कोसळत आहे. मान्सून सुरु होण्यापूर्वीच जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. जूनच्या मध्यंतरी पावसाने खंड दिल्यानंतर सुरुवातीला पेरणी करणारा बळीराजा चिंताग्रस्त झाला होता; परंतु ही चिंता फार टिकली नाही आणि पावसाने १८ जूनपासून पुन्हा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. यंदा प्रामुख्याने मंगरुळपीर आणि कारंजा तालुक्यात पावसाची सरासरी अधिक आहे. मंगरुळपीर तालुक्यात १० जूनपर्यंत ४०७. ३३ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यात १ जून ते १० जूनपर्यंत पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १८९.२० टक्के आहे, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५५.६२ टक्के आहे. कारंजा तालुुक्यात  १० जूनपर्यंत ३९४.९४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यात १ जून ते १० जूनपर्यंत पडणाºया पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १७२.२८ टक्के आहे, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५५.०० टक्के आहे. त्याशिवाय मालेगाव तालुक्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ४४.०८ टक्के, मानोरा तालुक्यात ४२.४३ टक्के, वाशिम तालुक्यात ४१.१९ टक्के, तर रिसोड तालुक्यात ४१.०८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :washimवाशिमmonsoon 2018मान्सून 2018