.............................
एस.टी. बसमध्ये नियमांचे उल्लंघन
वाशिम : वाशिम ते रिसोड मार्गावर धावणाऱ्या एस.टी. बसेसमध्ये कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेकजण तोंडाला मास्क वापरत नसून फिजिकल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.
................................
शंभरावर ग्राहकांची वीज खंडित
वाशिम : शहरातील शंभरापेक्षा अधिक ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या थकीत देयकाची रक्कम अदा केली नाही. त्यामुळे संबंधितांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्याची कारवाई गेल्या काही दिवसांत करण्यात आली, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.
................
अवैध वाहतुकीवर कारवाई
वाशिम : जिल्हा वाहतूक विभागाने मुख्य मार्गावर तगडा बंदोबस्त ठेवून वाशिम ते अनसिंग मार्गावर होणाऱ्या अवैध वाहतुकीवर कारवाई केली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही धडक मोहीम राबविण्यात आली.
...........
खासगी बसेस भरताहेत खचाखच
वाशिम : वाशिम-रिसोड मार्गावर धावणाऱ्या खासगी बसेस प्रवाशांनी खचाखच भरून धावत आहेत. काही प्रवाशांकडून नियमांचे पालनदेखील केले जात नसल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी पाहावयास मिळाले.