लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): मेव्हणा व जावई यांच्यामध्ये ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात २० सप्टेंबर रोजी अल्पवयीन मेव्हण्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील असून, मृतक जावयाचे नाव चंद्रमनी धोंडीराम खंडारे (२५) असे आहे. मृतक जावयाच्या भावाने मालेगाव पोलिसात १९ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे की, ७ सप्टेंबर रोजी पांगराबंदी येथील चंद्रमनी धोंडीराम खंडारे हे पत्नीला भेटण्यासाठी मारसुळ येथे सासºयाकडे आले होते. तिथे त्यांचा अल्पवयीन मेव्हण्यासोबत वाद झाला. वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. अल्पवयीन मेव्हणा व नातेवाईकांनी चंद्रमणी खंडारे यांना जबर मारहाण केली. उपचारादरम्यान ७ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान खंडारे यांचा मृत्यू झाला. या अगोदर मालेगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी मृतकाचा भाऊ अमोल खंडारे याने मालेगाव पोलिसात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी भादंवी कलम ३०२, ३४ नुसार अल्पवयीन मेव्हण्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद केली.
जखमी जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 19:50 IST
मालेगाव : मेव्हणा व जावई यांच्यामध्ये ७ सप्टेंबर रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासंदर्भात २० सप्टेंबर रोजी अल्पवयीन मेव्हण्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मालेगाव तालुक्यातील मारसूळ येथील असून, मृतक जावयाचे नाव चंद्रमनी धोंडीराम खंडारे (२५) असे आहे.
जखमी जावयाचा उपचारादरम्यान मृत्यू
ठळक मुद्देमेव्हण्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल मारसूळ येथील घटना