शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

मडाण नदीच्या पुनरूज्जीवनासंदर्भात गडकरी यांच्याशी शिष्टमंडळाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:14 IST

मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याबाबत शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली.

ठळक मुद्देनदीकाठी बारा गावे शिष्टमंडळाने दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा पासून उगम पावणारी पिंपळखूटा येथे अडाण नदीला संगम होणारी मडाण नदी ही पुरातन नदी आहे. ही नदी उथळ झाल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यामुळे १२ गावातील अंदाजे २५ हजार नागरीक प्रभावित होतात. यामुळे मडाण नदीचे खोलीकरण, रूंदीकरण करून पुनरूज्जीवीत करणे अत्यावश्यक झाल्याबाबत शिष्टमंडळाने केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली.मडाणच्या काठानजीक सायखेडा, निंबी, मानोली, गोलवाडी, अरक, चिंचाळा, जांब, आजगाव, हिसई, पार्डी, चांभई, पिंपळखूटा ही १२ गावे येतात. या गावातील शेकडो एकर शेतजमीन काठावर आहे. नदी गाळाने भरल्याने पावसाळ्यात शेतजमीनीतून पाणी वाहत असल्याने खरीप पिकाचे व शेतजमीनीचे प्रचंड नुकसान होते. सर्व पाणी वाहून गेल्याने रब्बी पिकासाठी नदीत पाणी नसते. तसेच विहीरी व विंधन विहीरी उन्हाळ्यात कोरड्या पडत आहे. मडाण खोलीकरण, रूंदीकरण व नदीत डोह निर्माण केल्यास या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो. डोह निर्माण करून आवश्यकते नुसार सिमेंट नाला केल्यास २ हजार ५०० स.घ.मी. जलसाठा होवून १ हजार १०० हेक्टर शेतजमीन सिंचना खाली येवू शकते. अशा स्वरूपाची माहिती परीसरातील नागरीकांच्या शिष्टमंडळाने लिखीत स्वरूपात केंद्रीय जलसंधारण ना. नितीन गडकरी यांना नागपुर येथे  ५ नोव्हेंबर रोजी भेटून दिली. ना. गडकरीना निवेदन सादर करण्यात आले. त्यावर लक्ष्मीकांत महाकाळ, जलहक्क कार्यकर्ते सचिन कुळकर्णी, सायखेडा सरपंचा विद्या गहुले, मनिष गहुले, पं. स. सभापती निलीमा देशमुख, निंबी सरपंचा विशाखा मनवर, राजेश टोपले, मानोली सरपंचा शितल लोखंडे, नारायण लोखंडे, गौतम मनवर, चंदू महाकाळ, गोलवाडी सरपंच सागर शिंदे, अशोक शिंदे, अरक सरपंचा ललिता आमटे, चिंचाळा ग्रा.प. सदस्य राजु गजभार, जांब सरपंच साहेबराव भगत, धनंजय अव्हाळे, हिसईचे किशोर जाधव, चांभई सरपंच गजानन खरबडे, पार्डी सरपंच विजय लांभाडे, पिंपळखूटा सरपंचा चंदाताई धोटे, मसोलाचे भास्कर मुळे  स्वाक्षºया आहेत. 

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीriverनदी