शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव येथे होणार शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 15:35 IST

मालेगाव : शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर विचारविनिमय होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मालेगावच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी मालेगाव येथे तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर विचारविनिमय होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ शाखा मालेगावच्यावतीने ३० सप्टेंबर रोजी मालेगाव येथे तालुकास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघाचे पदाधिकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शिक्षण क्षेत्रामधे शेकडो संघटना व स्वतंत्र आमदार कार्यरत असतांनाही शिक्षण क्षेत्रातील समस्या का संपत नाहीत, या विषयावर चर्चा होणार आहे तसेच संघटीत व असंघटीत क्षेत्रातील कर्मचारी व कामगारांना त्यांच्या समस्यांची जाणीव करून देणे व त्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच ‘ट्रेड युनियन’ निर्माण करण्याची आवश्यकता का आहे, या विषयावर सुद्धा चर्चा होणार आहे. शिबिराच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे विदर्भ प्रभारी प्रा. पी. एस. आठवले  राहणार असुन उदघाटक म्हणून संस्थाचालक अनिल गवळी राहतील. प्रमुख वक्ते प्रा. भरत आव्हाळे, प्राचार्य प्रकाश कापुरे व वाशिम जिल्हाध्यक्ष अरुण इंगळे हे राहणार आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी गौतम खंडारे आणि सर्व केंद्रप्रमुख यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी प्राचार्य वसंतराव अवचार, आर. के. चौधरी, दिलीप तायडे, गोवर्धन इंगळे, रवि ताकतोडे, महादेव घुगे, रऊफ बेग, प्रल्हाद पौळकर, सदानंद भालेराव, वासुदेव भगत, सुभाष घुगे, प्रा. अनिल काळे, नागेश कव्हर, दत्तात्रय शिंदे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांवर मंथन होण्याच्या दृष्टिकोनातून या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक किसन करवते, अनिल सोळंके, दिलीप ठाकरे, सुमेध तायडे, विनोद कांबळे, नारायण कांबळे, निमंत्रक श्रावण जाधव व विजय भुरकाडे यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवEducation Sectorशिक्षण क्षेत्र