शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुली बेपत्ता होण्याच्या घटनांनी वाढली पोलिसांची डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 16:00 IST

ली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.

- सुनील काकडे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात यापुर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन ७६ पैकी ६० मुलींचा शोध लागला असला तरी १६ मुली नेमक्या कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागेना. अशातच १४ फेब्रूवारी रोजी शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील जांब अढाव येथून एक मुलगी बेपत्ता झाली. तथापि, मुली बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी देखील वाढली आहे.सन २०१९ मध्ये जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ६२ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. त्यातील ४९ मुलींचा शोध लागला; मात्र राज्यभरातील अनेक जिल्हे पिंजून काढल्यानंतरही पोलिसांना १३ मुलींचा आजतागायत थांगपत्ता लागलेला नाही. असे असताना जानेवारी २०२० या एकाच महिन्यात तब्बल १४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यामुळे खडबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने तातडीची पावले उचलत तथा तपासचक्र गतीने फिरवून ११ मुलींचा शोध घेतला; मात्र ३ मुली आजही बेपत्ताच आहेत.विशेष बाब म्हणजे वाशिम शहरातून १९ फेब्रूवारीला बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचे प्रकरण थेट गृहमंत्र्यांपर्यंत पोहचले. वाशिम जिल्हा पोलिस दलाने याप्रकरणी मुलीचे नातेवाईक, मित्र-मैत्रीणींकडे सातत्याने चौकशी केली. अनेक ठिकाणचे सीसी फुटेजही तपासण्यात आले; मात्र त्याचा कुठलाच फायदा झालेला नाही. याच प्रकरणी पोलिसांनी तपासकार्याला अधिक गती द्यावी, अशी मागणी पुढे रेटत वाशिममध्ये ७ फेब्रूवारीला भव्य स्वरूपात जनआक्रोश मोर्चा देखील निघाला होता, हे विशेष. असे असताना सदर मुलीचा आजपर्यंत थांगपत्ता लागलेला नाही.

सरपंच संघटनेचा मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहारवाशिम शहरातून १९ जानेवारीला बेपत्ता झालेल्या मुलीसह इतरही अनेक अल्पवयीन मुलींचा शोध अद्यापपर्यंत लागलेला नाही. घडलेल्या सर्वच प्रकरणांचा तातडीने छडा लावावा, अशा आशयाचे पत्र वाशिम जिल्हा सरपंच संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविले आहे.

मुला-मुलींच्या समुपदेशनासाठी प्रशासन घेणार पुढाकारजिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण अलिकडच्या काळात वाढले आहे. संबंधित मुलींचा शोध घेण्याचा सर्वंकष प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून सुरू आहे. जिल्हा प्रशासनही शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींच्या समुपदेशनासाठी पुढाकार घेणार असून जिल्ह्यातील पालकांनीही त्यास सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे मत वाशिमचे जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाचे सर्वच पातळीवर युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. तांत्रीक बाबी तपासण्याची जबाबदारी ‘सायबर सेल’कडे सोपविण्यात आली असून प्रत्येक पोलिस ठाण्यात ‘मिसींग सेल’ कार्यान्वित करण्यात आला आहे. पोलिस आपले काम इमानेइतबारे करित आहे, पालकांनी देखील आपल्या अल्पवयीन मुलामुलींच्या प्रत्येक हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवायला हवे.- वसंत परदेशीजिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं