शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर पंचायत समितीच्या आवारात नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 15:09 IST

मंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: येथील पंचायत समिती कार्यालयात विविध कामानिमित्त दरदिवशी शेकडो नागरिक येत असतात. या नागरिकांना अधिकाऱ्यांच्या व्यस्ततेमुळे प्रतिक्षा करणे क्रमप्राप्त ठरते; परंतु या प्रतिक्षेच्या वेळेत त्यांना सुखरूप थांबण्यासाठी सुविधाच उपलब्ध नाही. पावसाळ्याच्या दिवसांत त्यामुळे नागरिकांची मोठी त्रेधा तिरपिट उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम १०८मध्ये पंचायत समितीच्या कार्याचे वर्णन करण्यात आले आहे. यामध्ये शेतीविषयक सुधारणांच्या योजनांची अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे, पाझर तलावांच्या कामांना गती देणे, जलसिंचनाच्या सोयी करणे,      पशुधनाचा विकास करणे, गावागावांना जोडणाºया रस्त्यांची दुरूस्ती करणे, हस्त कलाद्योग व कुटीरउद्योगांना प्रोत्साहन देणे, समाजकल्याणच्या विविध योजना राबवणे आदिंचा समावेश आहे. अर्थातच या कामांशी संबंधित ग्रामीण भागांतील शेकडो लोक पंचायत समिती कार्यालयात दरदिवशी येत असतात. त्यामुळे येथे येणाºयांची संख्या लक्षणीय असते. येथे येणाºया प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधून त्याचे समाधान करणे अधिकारी, कर्मचाºयांचे कर्तव्य असते; परंतु एकाच वेळी अनेकांसोबत संवाद साधणे शक्य नसल्याने अनेक ग्रामस्थांना प्रतिक्षा करावी लागते. ही बाब लक्षात घेऊन येथे येणाºया ग्रामस्थांना प्रतिक्षेत थांबण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे; परंतु मंगरुळपीर येथील पंचायत समिती कार्यालयात, अशी सुविधा नाही. त्यातच कार्यालयातील कक्षांची व्याप्ती मर्यादित असल्याने येथे येणाºया लोकांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागते. पावसाळ्याच्या दिवसांत पाऊस पडत असल्यास या लोकांची मोठी त्रेधा तिरपिट उडते.

टॅग्स :MangrulpirमंगरूळपीरNagar Bhavanनगरभवन