शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात डिजिटल सातबारा प्रक्रिया संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:40 IST

वाशिम : जिल्ह्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेचे अत्यंत संथगतीने सुरू असून, ८०९ गावांतील २४९२४५ सर्वे/ गट क्रमांकांतील सातबारांपैकी के वळ २० टक्के गटक्रमांकातील सातबारांवर सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन ते  संबंधित संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत.

ठळक मुद्देसातबारा अद्ययावतीकरणाची अंतिम प्रक्रिया म्हणून शेतकºयांच्या सातबारांवर तलाठ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया अर्थात डिजिटल सातबारा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात या प्रक्रियेंतर्गत ८०९ गावांतील २४९२४५ सर्वे/ गट क्रमांकांतील सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होणे आवश्यक आहे.

वाशिम : जिल्ह्यात डिजिटल सातबारा प्रक्रियेचे अत्यंत संथगतीने सुरू असून, ८०९ गावांतील २४९२४५ सर्वे/ गट क्रमांकांतील सातबारांपैकी के वळ २० टक्के गटक्रमांकातील सातबारांवर सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होऊन ते  संबंधित संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासानुसार येत्या १ आॅगस्टपर्यंत दीड महिन्यांत उर्वरित ८० टक्के काम पूर्ण करण्याचे आव्हान महसूल प्रशासनापुढे आहे.  राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातील या कार्यक्रमांतर्गत संगणकीकृत सातबाराच्या डेटाचे अद्ययावतीकरण करणे, युनिकोडमध्ये रुपांतर करणे, तालुका स्तरावरील महसूल कार्यालयांची समांतर जोडणी करणे व दुय्यम निबंधक कार्यालयांची महसूल कार्यालयांशी जोडणी करणे, या बाबी एकत्रीत करुन आॅनलाईन फेरफार प्रक्रिया राज्यभरात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सर्वप्रथम सातबारांचे संगणकीकरण करण्यात आले. त्यानंतर संगणकीकृत सातबारांतील दुरुस्तीसाठी एडिट आणि रिएडिट या प्रक्रिया पार पडल्या. आता सातबारा अद्ययावतीकरणाची अंतिम प्रक्रिया म्हणून शेतकºयांच्या सातबारांवर तलाठ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीची प्रक्रिया अर्थात डिजिटल सातबारा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात या प्रक्रियेंतर्गत ८०९ गावांतील २४९२४५ सर्वे/ गट क्रमांकांतील सातबारांवर तलाठ्यांची डिजिटल स्वाक्षरी होणे आवश्यक आहे. तथापि, महसूल प्रशासनाकडून यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्याचे दिसत असून, १७ मे रोजीपर्यंत केवळ २० टक्के गट क्रमांकातील सातबारांवर डिजिटल स्वाक्षरी होऊन ते संबंधित संकेतस्थळावर टाकण्यासाठी तयार झाले आहेत. संथगतीने होत असलेल्या या प्रक्रियेमुळे शेतकºयांचा डिजिटल सातबारा तयार होण्यास बराच विलंब लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :washimवाशिम