शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

ई-क्लास जमिनीवरील नियमबाह्य खोदकाम ‘रडार’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 14:09 IST

वाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारे गौण खनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले असून, जलसंधारण होऊ न शकणाºया ठिकाणी खोदकामास मज्जावही करण्यात आला आहे.

लोेकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी लागणारे गौण खनिजाची पूर्तता करताना जलसंधारणाची कामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले असून, जलसंधारण होऊ न शकणाºया ठिकाणी खोदकामास मज्जावही करण्यात आला आहे. असे असताना काही ठिकाणी ई-क्लास जमिनीवर नियमबाह्य खोदकाम होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत. या पृष्ठभूमीवर प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असून, ईक्लास जमिनीवर होत असलेल्या खोदकामावर कारवाई करण्याचे संकेत अधिकाºयांनी दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांसाठी मुरूम, गिट्टी, वाळू या गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. राष्ट्रीय महामार्गांसाठी लागणाºया गौण खनिजाची गरज पूर्ण करताना जलसंधारणाची कामेही होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकाºयांनी कंत्राटदार कंपन्यांच्या प्रतिनिधींसह अधिकाºयांची बैठक घेऊन जलसंधारण होऊ शकणाºया स्थळांचे सर्वेक्षण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तथापि, जेथे जलसंधारण होऊ शकत नाही, अशा कुठल्याही ई-क्लास जागेवर खोदकाम करता कामा नये, असे स्पष्ट निर्देशही देण्यात आले आहेत. अद्याप जलसंधारणाच्या कामांसाठी स्थळांचे सर्वेक्षण पूर्ण झाले नाही. तथापि, काही ठिकाणी कंत्राटदार कंपन्यांसह इतर काही लोक ई-क्लास जागेवर खोदकाम करीत असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीच्या पृष्ठभूमीवर महसूल विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. या चौकशीत ई-क्लास जागेवर नियमबाह्य पद्धतीने खोदकाम होत असल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :washimवाशिम