शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नाफेड खरेदीतील तूर साठविण्याची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 14:20 IST

र्व गोदामांत मिळून २४ हजार ३४० मेट्रिक टन धान्य साठविण्याची क्षमता आहे.

- दादाराव गायकवाड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: राज्य वखार महामंडळाच्या वाशिम युनिटमधील गोदामांत धान्य साठविण्यासाठी जागाच उरलेली नाही. त्यातच दोन गोदामांची दुरुस्ती सुरु असल्याने नाफेडच्या हमीभावाने तूर खरेदी योजनेंतर्गत खरेदी करण्यात येणारी तूर साठविण्याची पंचाईत झाली आहे.वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, वाशिम आणि मंगरुळपीर येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळांची गोदामे आहेत. या सर्व गोदामांत मिळून २४ हजार ३४० मेट्रिक टन धान्य साठविण्याची क्षमता आहे. त्यापैकी मालेगाव येथील ३ गोदामांत ४ हजार ७२०, मंगरुळपीर येथील ५ गोदामांत ७ हजार ९००, रिसोड येथील दोन गोदामांत २०००, तर वाशिम येथील सहा गोदामांत ९७९० मेट्रिक टन धान्य साठविले जाऊ शकते. आता यंदाच्या खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील उत्पादित मालाची प्रचंड आवक बाजारात सुरु असून, यातील बहुतांश शेतमाल हा वखार महामंडळाच्या गोदामांतच साठविण्यात येतो. त्याशिवाय अनेक शेतकरी अल्पदरामुळे शेतमालाची विक्री थांबवून तो शेतमाल शासकीय गोदामांत ठेवतात. यंदाही सोयाबीन वगळता प्रत्येक शेतमालास बाजारात अल्पदर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेतमाल शासकीय गोदामांत साठवून ठेवला आहे. त्यामुळे या गोदामांत आता साठवणुकीसाठी फारशी जागा उरलेली नाही. त्यातच वाशिम येथील सहापैकी चार गोदामांची साठवणूक क्षमता संपली असून, इतर दोन गोदामांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामुळे नाफेडच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत खरेदी करण्यात येत असलेली तूर साठविण्याची पंचाईत झाली आहे. शासनाने नोंदणीची अट शिथिल केल्यानंतर जिल्ह्यात ३३ हजार ६२ शेतकऱ्यांनी २९ फेब्रुवारीपर्यंत तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ ९१७ शेतकºयांकडील ८ हजार ७०५ क्विंटल तुरीची मोजणी होऊ शकली आहे. शासकीय गोदामांत साठवणुकीसाठी जागाच नसल्याने नाफेडच्या खरेदीदार संस्थानांही खरेदीत अडचणी येत आहेत.

वाशिम येथील खरेदी बंदवखार महामंडळाच्या वाशिम येथील ४ गोदामांत साठवणुकीसाठी जागाच उरली नसल्याने आणि उर्वरित दोन गोदामांची दुरुस्ती सुरु असल्याने सोमवारी नाफेडच्या वाशिम येथील खरेदी केंद्रावर तुरीची खरेदी बंद ठेवण्यात आल्याची माहिती संबंधित यंत्रणेकडून प्राप्त झाली. वाशिम तालुक्यात ८ हजार ११ शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी २९ फेब्रुवारीपर्यंत केवळ ६०९ शेतकºयांच्या ५ हजार ५७० क्विंटल तुरीची मोजणी होऊ शकली आहे. आता गोदामांत साठवणुकीसाठी जागाच नसल्याने पुढे खरेदीत अनेक अडचणी येणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती