मेळाव्याला अध्यक्षस्थानी दलित पँथरचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जगदीशकुमार इंगळे तर प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना जिल्हाप्रमुख रवि भांदुर्गे, बाळासाहेब देशमुख, मानवी हक्क सुरक्षा दलाचे अध्यक्ष भागवत कांबळे, नंदू पाटील काठोळे, गजानन गायकवाड, वनिता डाखोरे, रवि डाखोरे, लक्ष्मण सावळे, वैभव मोकळे, प्रदीप राजे, प्रल्हाद खंडागळे यांची उपस्थिती होती.
कलावंतांच्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्यातील आघाडी सरकारची सकारात्मक भूमिका असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कलावंतांना पाच हजार रुपये मदत दिल्यामुळे कलावंतामध्ये आघाडी सरकारप्रती सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील कलावंतांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी दलित पँथरचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे शिष्टमंडळ लवकरच मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन, त्यांच्यापुढे कलावंतांच्या मागण्या मांडण्यात येईल, असे इंगळे यांनी सांगितले. मेळाव्याचे आयोजन व्यसनमुक्ती केंद्र अडोळीचे मुख्य संयोजक शाहिर के.के. डाखोरे यांनी केले होते.
००००
विविध विषयांवर चर्चा
या मेळाव्यात लोककलावंतांना रोजगार द्यावा, मानधन दरमहा द्यावे, यासह लोककलावंतांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मेळाव्याला कलावंत यशवंत धाबे, दत्ता भालेराव, रामदास भालेराव, प्रल्हाद खंदारे, देवेंद्र खंदारे यांच्यासह जिल्ह्यातील कलावंत सहभागी झाले होते.