शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्राम योजनेतील अन्यायाविरोधात ढोरखेडा ग्रामस्थांचे ७ फेब्रुवारीला धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 17:23 IST

शिरपूर जैन: चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ७ फेब्रुवारीला पंचायत समिती मालेगाव येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत गटविकास अधिकाºयांना ६ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे.

ठळक मुद्देस्मार्ट ग्राम योजनेच्या पुरस्कारापासून ढोरखेडा गावाला वंचित ठेवण्यात आले. तर मालेगाव तालुक्यातीलच एकांबा या ग्रामपंचायतीने या योजनेत सहभाग घेतला नसतानाही या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. ढोरखेडा ग्रामपंचायतीला न्याय द्यावा, यासाठी ७ फेब्रुवारीला पंचायत समितीसमोर ढोरखेडा येथील ग्रामस्थ एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत.

शिरपूर जैन: शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेत सहभागी होऊनही मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले, तर सहभाग न होणाऱ्या  एकांबा ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. यामुळे ढोरखेडा येथील ग्रामस्थ निराश झाले आहेत. या  प्रकाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी त्यांनी ७ फेब्रुवारीला पंचायत समिती मालेगाव येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत गटविकास अधिकाºयांना ६ फेब्रुवारीला निवेदन देण्यात आले आहे.

ढोरखेडा येथील कडूजी मिटकरी व ग्रामस्थांच्या स्वाक्षरीनिशी गटविकास अधिकाºयांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद आहे की, शासनाचया स्मार्ट ग्राम योजनेत मालेगाव तालुक्यातील ढोरखेडा ग्रामपंचायतने सहभागी होऊन स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबवून जनजागृतीही केली; परंतु या योजनेच्या पुरस्कारापासून ढोरखेडा गावाला वंचित ठेवण्यात आले, तर मालेगाव तालुक्यातीलच एकांबा या ग्रामपंचायतीने या योजनेत सहभाग घेतला नसतानाही या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली. ही निवड कोणत्या निकषावर करण्यात आली. त्याची चौकशी करून ढोरखेडा ग्रामपंचायतीला न्याय द्यावा, यासाठी ७ फेब्रुवारीला पंचायत समितीसमोर ढोरखेडा येथील ग्रामस्थ एकदिवसीय धरणे आंदोलन करणार आहेत. या निवेदनावर कडूजी प्रल्हा मिटकरी, पांडुरंग सावले, प्र. नि. पवार आदिंच्या स्वाक्षºया आहेत. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार मालेगाव आणि पोलीस निरीक्षक मालेगाव यांना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :washimवाशिम