शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; रास्ता रोकोचा इशारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:02 IST

मालेगाव : आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाची धग अद्याप कायम असतानाच आता आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मालेगाव : आरक्षणासाठी मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाची धग अद्याप कायम असतानाच आता आता धनगर समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला आहे. गेल्या ४ वर्षांपासून आरक्षणाबाबत केवळ आश्वासन देणाºया शासनाचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पावित्रा आता धनगर आरक्षण कृती समितीने घेतला आहे. या संदर्भात संघटनेच्या मालेगाव शाखेने १० आॅगस्ट रोजी मालेगावच्या तहसीलदारांसह शिरपूरच्या पोलीस निरीक्षकांनाही निवेदन सादर केले आहे. मुख्यमंत्री देवेन्द फडणवीस यांनी भाजप सत्तेवर नसताना ४ वर्षांपूर्वी बारामती येथे धनगर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात उपस्थिती लावली होती. यावेळी समाजबांधवांना संबोधित करताना आमच्याकडे सत्ता आल्यास मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानंतर राज्यात भाजपचही सत्ता स्थापन झाली परंतु बारामतीच्या मेळाव्यात धनगर समाज बांधवांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता यांनी अद्यापही केली नाही. त्यांना त्यांच्या आश्वासनाचे स्मरण करून देण्यासह आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी धनगर समाज संघटनांच्यावतीने वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली आणि आंदोलनही केले; परंतु त्याचीही दखल घेण्यात आली नाही. या प्रकारामुळे धनगर समाज बांधवांत रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, आरक्षणासह धनगर समाजाच्या प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेतल्या नाही, तर रास्तारोको आंदोलन करू, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीने घेतला आहे. या संदर्भात मालेगाव तहसीलदार आणि शिरपूरच्या पोलीस निरीक्षकांना १० आॅगस्ट रोजी निवेदनही सादर करण्यात आले.  निवेदन देते वेळी विजय शेंडगे, नागेश गावजे, गोपाल टोंचर, गजानन जटाळे, गणेश बोबडे, उमेश बोबडे, किसन गारगे, नवनाथ जटाळे, ओमप्रकाश हुले, बबनराव मिटकरी आदि धनगर समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव